छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने लग्नगाठ बांधली. तिने बॉयफ्रेंड शाहनवाज शेखशी लोणावळ्यात मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्न केलं. तिच्या मेहंदी, संगीत आणि लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिने गुपचूप लग्न करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. देवोलीना आणि शाहनवाज मागच्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर आज त्यांनी लग्न केलं. सुरुवातीला देवोलीनाच्या मित्रमैत्रिणींनी तिच्या लग्नाचे फोटो शेअर केले होते. त्यामुळे तिचं लग्न खरंच झालंय की नाही, याबद्दल चाहते संभ्रमात होते. पण देवोलीनाने तिच्या लग्नाच्या वृत्तांची पुष्टी केली आहे आणि लग्न झाल्याबद्दल माहिती दिली आहे. देवोलीनाचे नववधूच्या लूकमधील फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

‘गोपी बहू’ने मुस्लीम तरुणाशी केलंय लग्न, जाणून घ्या काय करतो देवोलीनाचा पती

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar Pre Wedding Rituals
आली लग्नघटिका समीप! पार पडला ग्रहमख सोहळा, ‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या होणार्‍या पत्नीने शेअर केले खास फोटो

दरम्यान, देवोलीनाने ‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिच्या लग्नाबाबत भाष्य केलं. याचबाबत तिला विचारलं असता देवोलीना म्हणाली, “माझा पती कोण आहे हे सध्या गुपितच राहू द्या. वेळ आल्यावर मी सगळं काही सांगेन.” त्यामुळे देवोलीना इतक्यात पतीबद्दल चाहत्यांना माहिती देणार नाही, असं वाटत होतं. पण तिने इन्स्टाग्रामवर लग्नानंतर पहिली पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिने पतीबरोबरचे काही फोटो शेअर केले आहे आणि एक सुंदर कॅप्शन दिलंय.

छोट्या पडद्यावरील ‘गोपी बहू’ने गुपचूप उरकलं लग्न, नवऱ्याचं नाव व चेहरा दाखवण्यास दिला नकार, म्हणाली…

“…आणि होय मी अभिमानाने सांगू शकते की मी त्याची आहे आणि हो… शोनू “मी दिवा घेऊनही शोधायला निघाले असते, तरी तुझ्यासारखा दुसरा कोणी मला मिळाला नसता. तू माझ्या वेदना आणि प्रार्थनांचं उत्तर आहेस. आय लव्ह यू शोनू. माझ्या आयुष्यातील रहस्यमयी व्यक्ती आणि तुमचा सर्वांचा जीजू #SHONU” तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठिशी असू द्या, असं कॅप्शन देवोलीनाने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टला दिलंय.

यामध्ये तिने शाहनवाजबरोबरचे तीन फोटो शेअर केले आहे. फोटोंमध्ये नववधूच्या वेशात सजलेली देवोलीना खूप सुंदर दिसत आहे. तिने लाल रंगाचे कपडे परिधान केले आहेत. तर, शाहनवाजने काळ्या रंगाचा सूट परिधान केला आहे. दरम्यान, शाहनवाज शेख हा जिम ट्रेनर असून दोघेही एकमेकांना दोन वर्षांपासून डेट करत होते.

Story img Loader