सध्या सर्वत्र लग्नाचा माहोल आहे. अनेकजण विवाहबंधनात अडकत आहेत. सेलिब्रिटीही याला अपवाद नाहीत. गेल्या एका महिन्यात हिंदी आणि मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार विवाह बंधनात अडकले आहेत, तर येत्या काळात काही लग्न करणार आहेत. आता या यादीत एका लोकप्रिय हिंदी अभिनेत्रीचा समावेश झाला आहे.
टीव्ही अभिनेत्री ‘देवों के देव महादेव’ फेम सोनारिका भदोरिया तिच्या बोल्ड फोटोशूटसाठी ओळखली जाते. या टीव्ही शोच्या माध्यमातून तिने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. अलीकडेच सोनारिकाचा तिचा प्रियकर उद्योगपती विकास पराशरशी साखरपुडा संपन्न झाला. तिच्या साखरपुड्याचे काही फोटो तिने सोशल मीडियावरून चाहत्यांशी शेअर केले आहेत.
आणखी वाचा : “जिनिलीयाने नियम केलाय…”; रितेश देशमुखने सांगितलं बायकोबरोबरच्या खास केमिस्ट्रीमागील गुपित
हे तिच्या साखरपुड्याचे फोटो पोस्ट करताना तिने लिहिले, “३ डिसेंबर २०२२… मला आयुष्यभराची भेट मिळाली! आणि या आशीर्वादासाठी मी सदैव आभारी असेन. साखरपुड्याच्या शुभेच्छा लव्ह…”
हेही वाचा : राणादा-पाठक बाईंपाठोपाठ ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीने गुपचूप उरकले लग्न, म्हणाली…
या साखरपुड्याला सोनाक्रिका भदोरियाने गुलाबी रंगाचा सुंदर ड्रेस परीक्षण केला होता. तर विकासने पूर्ण पांढऱ्या रंगाचा सूट घातला होता. यावेळी दोघांनीही समुद्राच्या काठी रोमँटिक पोज दिली. त्यांनी त्यांचा साखरपुडा खास केक कापून सेलिब्रेट केला. यावेळी त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. तिचे चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.