Bigg Boss Marathi Fame Dhananjay Powar New Car : धनंजय पोवार म्हणजेच इचलकरंजीचा ‘डीपी’ दादा ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वामुळे घराघरांत लोकप्रिय झाला. लोकांनी दिलेल्या प्रेमामुळे त्याला शोच्या अंतिम फेरीत टॉप-४ पर्यंत मजल मारता आली. शो संपला असला तरीही डीपीची लोकप्रियता कमी झालेली नाही. त्याचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशातच आपल्या लाखो चाहत्यांना धनंजयने एक आनंदाची बातमी दिली आहे. डीपीच्या घरी नव्या पाहुणीच्या रुपात आलिशान गाडीचं आगमन झालेलं आहे. नव्या गाडीची पहिली झलक त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धनंजय ( Dhananjay Powar ) आपल्या घरातल्या सगळ्या सदस्यांशी किती जास्त जोडला गेलाय याची प्रचिती प्रेक्षकांना ‘बिग बॉस’च्या फॅमिली वीक आठवड्यात आली होती. आई-बाबा व पत्नीला पाहून अनेक दिवसांनी पाहिल्यावर डीपी प्रचंड रडला होता. अर्थात कुटुंब म्हणजे सर्वस्व मानणारा धनंजय आपल्या वडिलांचं प्रत्येक स्वप्न कसं पूर्ण होईल याची काळजी घेत असतो. त्याच्या वडिलांनी पाहिलेल्या अशाच एका स्वप्नामुळे तसेच आपल्या दोन मुलांच्या आनंदासाठी धनंजयने नवीन गाडी खरेदी केली आहे. ही गाडी खरेदी करण्याचं खरं कारण त्याने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत सांगितलं आहे.

हेही वाचा : स्वप्नील जोशी अन् प्रसाद ओक पहिल्यांदाच एकत्र झळकणार! सोबतीला असेल मालिकाविश्व गाजवणारी ‘ही’ अभिनेत्री

धनंजय पोवारने खरेदी केली नवीन गाडी

“असं काहीतरी करायचं जेणेकरून लोकांनी आपलं साम्राज्य बघावं. दीड वर्षांपूर्वी वडिलांनी एक स्वप्न पाहिलं होतं. त्यांच्या नातवडांनी सनरुफमधून बाहेर यावं असं त्यांना नेहमी वाटायचं आणि आज तो दिवस आहे जेव्हा या सनरुफमधून माझी मुलं बाहेर आली. माझ्या वडिलांच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य बघा, या माझ्या आईच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य बघा…गाडी घेण्याचं कारण फक्त एकच…वडिलांना हेच हवं होतं की, त्यांच्या नातवंडांनी या सनरुफमधून बाहेर यावं. त्याचा ( सनरुफ ) आनंद त्यांनी घेतला पाहिजे. फक्त या गोष्टीसाठी ही नवीन गाडी घेतली. माझ्याकडे गाडी होती, ती जुनी गाडी विकली आणि ही नवीन गाडी घेण्याचं कारण म्हणजे फक्त वडिलांनी पाहिलेलं स्वप्न. आयुष्याचा आनंद हा फक्त पैशात नाहीये… तर, खरा आनंद आपल्या घरातल्यांच्या इच्छा पूर्ण करण्यात आहे.” असं म्हणत धनंजयने ( Dhananjay Powar ) त्याच्या चाहत्यांना ही आलिशान गाडी खरेदी करण्याचं खरं कारण सांगितलं आहे.

हेही वाचा : “गूड बाय यश अरुंधती देशमुख…”; ‘आई कुठे काय करते’ फेम अभिषेक देशमुखने लिहिली भलीमोठी भावुक पोस्ट, म्हणाला, “निरोप घेताना…”

Bigg Boss Marathi Fame Dhananjay Powar New Car

दरम्यान, धनंजयच्या ( Dhananjay Powar ) पोस्टवर अंकिता वालावलकरने, “शेवटी भाव कोणाचो” अशी कमेंट केली आहे. याशिवाय डीपीच्या असंख्य चाहत्यांनी या नव्या गाडीसाठी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhananjay powar bought new car and complete fathers dream watch video sva 00