Dhananjay Powar And Iirina : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व जरी संपलं असलं, तरीही यात सहभागी झालेल्या सगळ्या स्पर्धकांची लोकप्रियता आजही कायम आहे. यंदाच्या पर्वात पहिल्यांदाच ‘परदेसी गर्ल’ इरिनाने एन्ट्री घेतली होती. ‘बिग बॉस’च्या घरात मराठी परंपरा जपणारी इरिना सर्वांच्या पसंतीस उतरली होती. शोचा ग्रँड फिनाले संपल्यावर ही परदेसी गर्ल सध्या अन्य सदस्यांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत असल्याचं पाहायला मिळत आहे.

इरिना सर्वप्रथम सूरज चव्हाणच्या मोढवे गावी पोहोचली होती. यावेळी तिच्याबरोबर वैभव देखील होता. मात्र, आता इरिनाने थेट कोल्हापूर गाठलं आहे. इरिना ‘डीपी दादा’ ( Dhananjay Powar ) आणि त्याच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी कोल्हापुरात पोहोचली आहे. याचा खास व्हिडीओ धनंजयने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

हेही वाचा : काय गं सखू, बोला दाजिबा! दादा कोंडकेंच्या सुपरहिट गाण्यावर प्रथमेश परबचा मॉडर्न अंदाज; सोबतीला आहे पत्नी, पाहा व्हिडीओ

धनंजय पोवारच्या घरी इरिनाचं स्वागत ( Dhananjay Powar )

हेही वाचा : “ट्रक उलटून माझा मृत्यू झाला तर…”, घोडबंदर मार्गाने प्रवास करणारा अभिनेता संतापला; म्हणाला, “घाणेरड्या रस्त्यांमुळे…”

“परदेशात राहून आपली संस्कृती जपणारी” असं कॅप्शन देत धनंजयने ( Dhananjay Powar ) इरिना कोल्हापुरात आल्याची खास झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. यामध्ये डीपीची पत्नी व आई इरिनाचं औक्षण करत तिचं स्वागत करतात. याशिवाय तिच्या स्वागतासाठी धनंजयने खास फुलांची उधळण केल्याचं देखील या व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं. धनंजय या व्हिडीओमध्ये इरिनाला काही मराठी वाक्य बोलायला शिकवत असल्याचं दिसलं. “संपला का विषय, आई महालक्ष्मीच्या नावानं चांगभलं” हे वाक्य बोलायला सांगत डीपीने इरिनाला मराठीचे धडे देखील दिली. ‘बिग बॉस’च्या घरात सुद्धा धनंजय अशाचप्रकारे इरिनाला मराठी शिकवताना दिसायचा.

हेही वाचा : “अविच्या नावावरचं पहिलं घर…”, ऐश्वर्या नारकरांनी दाखवली नव्या फ्लॅटची झलक, पतीसाठी लिहिली खास पोस्ट, म्हणाल्या…

धनंजयच्या घरी झालेलं स्वागत पाहून परदेसी गर्ल भारावून गेल्याचं पाहायला मिळालं. इरिनाने या व्हिडीओवर “नुसतं प्रेम भावा…” अशी कमेंट करत पोवार कुटुंबीयांचे आभार मानले आहेत. याशिवाय नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर “जगात भारी आम्ही कोल्हापुरी”, “कोल्हापूर इचलकरंजीचं नाव गाजवणारा म्हणजे आपला धनंजय पोवार दादा”, “इरिना मला अभिमान वाटतो तुम्ही मराठी भाषा बोलता” अशा प्रतिक्रिया देत कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.