Bigg Boss मध्ये सहभागी झालेले स्पर्धक प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहतात. वाद-विवाद, भांडणे यांबरोबरच त्यांच्या वेगळेपणामुळे हे स्पर्धक प्रेक्षकांच्या मनात घर करतात. धनंजय पोवार यापैकीच एक आहे. बिग बॉस मराठीनंतर धनंजय पोवार(Dhananjay Powar) आता आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे.

काय म्हणाला धनंजय पोवार?

धनंजय पोवारने नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने बिग बॉसमधील खेळाविषयी वक्तव्य केले आहे. बी ग्रुप कसा तयार झाला, हे सांगताना धनंजय पोवारने म्हटले, “पहिला नॉमिनेशनचा टास्क जेव्हा झाला, त्यानंतर मी स्ट्रॅटेजी बनवली. सुरुवातीला मी ती अंकिताला सांगितली. अंकिता आधीच मला म्हटली होती की, मी एकटी खेळणार आहे. तर तिला मी म्हटलं की, थोडे दिवस तुला ग्रुपचा आधार घ्यावा लागेल आणि आम्हालादेखील तुझा आधार लागेल. तर सगळ्यात पहिल्यांदा अंकिताला तयार केलं. पुरुषोत्तमदादा तयार होते, त्यांनीच मला ही ग्रुप बनवण्याची कल्पना दिली होती. योगिता तयार होती. पॅडीदादांकडे गेलो. त्यांना म्हटलं की, तुमच्या अनुभवाची गरज आहे. अभिजीत, निखिल, आर्या सुरुवातीला त्या बाजूला होते. नंतर ते हळूहळू आमच्यात आले.”

Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Salman Khan
‘दबंग’ रिलोडेड लाइव्ह कॉन्सर्टसाठी सलमान खान सज्ज; म्हणाला, “स्टेजवर जाण्याआधी कपडे…”
Vivek Oberoi
“मला अंडरवर्ल्डमधून धमक्यांचे फोन यायचे”, बॉलीवूड अभिनेता विवेक ओबेरॉय म्हणाला, “माझ्या रिलेशनशिपच्या…”

पुढे धनंजय पोवारने म्हटले, “सगळ्या गोष्टी चांगल्या चालल्या होत्या. आम्ही व्यवस्थित चाललो होतो; पण ज्या गोष्टी मला जाणवल्या, मी माझ्या डोळ्यांनी बघितल्या, त्या घरामध्ये मला पटल्या नाहीत. माझ्या पाठीमागे काय बोलणं झालं वगैरे, मी अजून दुसरी बाजू बघितली नाही. मला त्यावेळी जाणवलं की, अभिजीतकडून मला झाकण्याचा प्रयत्न होतोय. तो स्वत: पुढे जातोय. थोडे दिवस या गोष्टी मी अंकिताला सांगितल्या. तिला ते पटत नव्हतं. पण तिच्या डोक्यात अभिजीत आणि मला बरोबर घेऊन जायचं होतं. मग हळूहळू मला त्या गोष्टी लक्षात आल्या, त्यानंतर मी तिला म्हटलं की, जेव्हा तुला गरज पडेल तेव्हा माझा तुला पाठिंबा असेल; पण जेव्हा तुझ्या आणि माझ्यामध्ये निवड करण्याची वेळ येईल, त्यावेळी मी स्वत:ला निवडेन. परंतु, तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत मी कायम तुझ्याबरोबर असेन. मी माझ्या शब्दावरून फिरलो नाही.”

हेही वाचा: सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारी मानसी पारेख कोण आहे? तिचा चित्रपट कोणता?

“जेव्हा मी बी टीममधून बाहेर पडलो, तेव्हादेखील ए टीमला पाठिंबा दिला नाही. मी अंकिताला हे वाक्य बोललो, मी निवडून आलेला अपक्ष आमदार आहे. मात्र, बी ग्रुपच्या विचारांना आजही सॅल्युट आहे. त्या विचारांसाठी त्या ग्रुपला नेहमीच पाठिंबा देत राहीन; पण त्याचा भाग मी होणार नाही. कारण- ज्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्ही निशाणे चालवताय, त्या गोष्टी मला पटत नाहीयेत. तुम्हाला लीडर व्हायचंय, तर तुम्ही बोललं पाहिजे. तुम्हाला बोलायचं नाहीये, लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवायची आहे, लोकांना वाईट करायचंय आणि तुम्हाला लीडर व्हायचं, तर या गोष्टी मला पटत नाहीत”, असे म्हणत धनंजयने आपले मत व्यक्त केले आहे.

दरम्यान, धनंजय पोवार सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असून, त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. बिग बॉसच्या घरातदेखील त्याचा वेगळा अंदाज पाहायला मिळाला. प्रेक्षकांचा त्याला मोठा पाठिंबा मिळत असल्याचे पाहायला मिळत होते.

Story img Loader