Bigg Boss Marathi Dhananjay Powar : कोल्हापूरचा लोकप्रिय रीलस्टार धनंजय पोवारने यंदा ‘बिग बॉस’चं पर्व प्रचंड गाजवलं. अचूक ग्रुपची निवड, गेमप्लॅन, सतत कॉमेडी, थट्टा-मस्करी करून संपूर्ण घराला हसत खेळत ठेवायचं या स्वभावाने महाराष्ट्राच्या तमाम प्रेक्षकांचं मन डीपीने जिंकून घेतलं. याशिवाय या घरात त्याला अंकिताच्या रुपात मानलेली बहीण भेटली. त्यामुळे सूरज असो किंवा अंकिता या सगळ्यांसाठी धनंजय घरचा ‘डीपी दादा’ झाला.

प्रेक्षकांना सुद्धा धनंजयचं ( Dhananjay Powar ) प्रत्येक सदस्याशी असलेलं बॉण्डिंग प्रचंड आवडलं. यामुळेच धनंजयला टॉप-४ च्या शर्यतीपर्यंत मजल मारता आली. खरंतर डीपीने घरात एन्ट्री केल्यावर तो इथवर पोहोचेल असं कोणालाच वाटलं नव्हतं मात्र, आपल्या खेळाने धनंजयने सर्वांचं मन जिंकून घेतलं. या ‘बिग बॉस’च्या घरात डीपीसाठी आणखी एक सकारात्मक गोष्ट घडली ती म्हणजे त्याचे बाबा खास इचलकरंजीहून त्याचं कौतुक करण्यासाठी मुंबईत आले होते.

couple committed suicide by hanging himself with a rope In Lakshmipur of Mulchera taluka gadchiroli
प्रेमीयुगुल आत्महत्या प्रकरण: मुलीच्या वडिलांनीही घेतला गळफास
ankita walawalkar reveals marriage plans and talk about future husband
अंकिताचा ‘कोकण हार्टेड बॉय’ कोण आहे? कोकणात करणार…
Tuljapur darshan, youths Kolhapur died accident,
तुळजापूरदर्शन करून परतताना अपघातात कोल्हापूरच्या दोघा तरुणांचा मृत्यू; तिघे जखमी
Groom dance for his wife in pune on Bhetal Java Gunyat Mala Atak Kara Punyat song
“जेव्हा नवरदेवाला मनासारखी बायको भेटते..” पुण्यात तरुण नाचता नाचता कुठे पोहचला पाहा; VIDEO होतोय व्हायरल
Janhvi Kapoor share Sridevi and boney Kapoor memories
लग्नानंतर श्रीदेवी भांडायला शिकल्या होत्या, जान्हवी कपूरने केला खुलासा; वडिलांबाबत म्हणाली, “ते आधीच…”
CSMT Railway Police arrested youth who molested 17 year old girl in Chennai train
डोंबिवलीत सावत्र वडिलांकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
18 year old college girl student commits suicide by hanging self in his hostel room
College Girl Suicide : नाशिकमध्ये वसतिगृहात विद्यार्थिनीची आत्महत्या
class 10 student ran away to boyfriends house
नागपूर : मुलींसाठी आईवडिल चिंतित,अन् ती सापडली ….

हेही वाचा : बापाचं प्रेम! Bigg Boss नंतर अडीच महिन्यांनी घरी परतणार धनंजय पोवार; वडील करताहेत ‘अशी’ तयारी, समोर आला व्हिडीओ

धनंजय पोवार पोहोचला कोल्हापुरला

धनंजय ( Dhananjay Powar ) आणि त्याच्या बाबांमध्ये गेली अनेक वर्षे अबोला होता. बाबांनी आपलं कौतुक करावं अशी डीपीची अनेक वर्षांची इच्छा ‘बिग बॉस’मुळे पूर्ण झाली. फॅमिली वीकमध्ये घरात एन्ट्री घेतलेल्या बाबांना पाहून धनंजयला अश्रू अनावर झाले होते. आता हे पर्व संपल्यावर डीपी पहिल्यांदाच कोल्हापुरात पोहोचला आहे.

 Dhananjay Powar
धनंजय पोवार (Dhananjay Powar)

मुलगा घरी येणार म्हणून धनंजयच्या वडिलांनी सकाळपासून सर्व तयारी केली होती. आधी लेकावर विश्वास न ठेवणारे बाबा आज घरी परतणाऱ्या मुलाची आतुरतेने वाट पाहत होते. कोल्हापुरला पोहोचल्यावर सर्वप्रथम डीपीने जोतिबाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर इचलकरंजी येते त्याचं आगमन झाल्यावर त्याच्या चाहत्यांनी भव्य रॅली काढली. डीपीने ( Dhananjay Powar ) यावेळी सगळ्या चाहत्यांचे आभार मानले, सर्वांना अभिवादन करून फोटो काढले. याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हेही वाचा : धनंजय पोवारच्या स्वागतासाठी खास कोल्हापुरी हलगी! डीपीच्या भव्य दुकानाबाहेर चाहत्यांची गर्दी, करतो ‘हे’ काम जाणून घ्या…

डीपीच्या चाहत्यांनी त्याच्यासाठी खास गाणं देखील तयार केलं होतं. हे गाणं मिरवणूकीत डीजेवर वाजवण्यात आलं. एकंदर त्याच्या स्वागतासाठी संपूर्ण कोल्हापूर नगरी सजल्याचं पाहायला मिळालं. धनंजय ट्रॉफी जिंकला नाही पण, त्याने आमचं मन जिंकलं अशा भावना त्याच्या चाहत्यांनी यावेळी व्यक्त केल्या.