Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात सध्या नॉमिनेशन प्रक्रिया सुरू आहे. आज ही नॉमिनेशन प्रक्रिया पूर्ण होणार असून या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी कोण-कोणते सदस्य नॉमिनेट होतील हे स्पष्ट होईल. आतापर्यंत निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर आणि अंकिता वालावालकर यांनी घरातील सदस्यांना नॉमिनेट केलं आहे. पण अंकिताने धनंजय पोवारला नॉमिनेट केल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. तसंच धनंजयची पत्नी व आईने यावर भाष्य करत ‘बिग बॉस’वर नाराजी व्यक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धनंजय पोवारच्या सोशल मीडियावर त्याच्या पत्नी व आईचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओतून दोघींनी धनंजयला एका तासाच्या भागात जास्त दाखवलं जात नसल्याचा आरोप ‘बिग बॉस’वर करत नाराजी व्यक्त केली आहे. नेमकं त्या काय म्हणाल्या? जाणून घ्या…

हेही वाचा – Video: “मला अजिबात पटलेलं नाही”, अंकिताने धनंजयला नॉमिनेट केल्यामुळे भडकली सोनाली पाटील, म्हणाली, “तुला जान्हवीबद्दल…”

या व्हिडीओच्या सुरुवातीला धनंजयची आई सून कल्याणीला विचारते की, काय गं कल्याणी, काल जान्हवी धनंजयला सेफ करताना काय म्हणाली? त्यावर डीपीची पत्नी म्हणाली, “जान्हवी म्हणाली, यांचा खेळ आहे. दिवसभर आमची चर्चा झालीये. सकाळपासून खेळाबद्दल आम्ही चर्चा करतोय. पण ती चर्चा कुठेच दाखवली नाही मम्मी? तसंच अंकिता ताईंनी त्यांना नॉमिनेट केलं हे पटलं नाहीये. तुम्हाला पटलं?” डीपीची आई म्हणाली, “मला तर अजिबात पटलं नाहीये. वैभवमुळे तिने आपल्या धनंजयला नॉमिनेट केलं.” पुढे कल्याणी म्हणाली, “त्या त्यांचा खेळ सुधारावा असं म्हणतायत, पण हे कारण पटलेलं नाहीये.”

हेही वाचा – Video: वर्षा उसगांवकर ‘या’ सदस्याला म्हणाल्या सेक्सी, अरबाजने सांगितला घरच्यांना किस्सा, पाहा व्हिडीओ

पुढे डीपीची आई म्हणाली की, “मला तर अजिबात पटलं नाहीये. याबद्दल जनतेला काय वाटतं? हे त्यांनी सांगावं, असं माझं म्हणण आहे. ज्यावेळेला आमचा धनंजय बोलतोय. खेळ कसा खेळायचा सांगतोय, समजवतोय, तेव्हा त्याला कॅमेरात दाखवतंच नाहीयेत, काय भानगड आहे?” त्यानंतर डीपीची पत्नी सांगितलं, ‘अनसीन अनदेखा’मध्ये दाखवतायत. पण संपूर्ण भागात का दाखवत नाहीयेत? एक चांगला एंटरटेनर म्हणून ते पुढे गेले आहेत. त्यांचं फुल्ल एंटरटेनमेंट आहे. जे तुम्ही ‘अनसीन अनदेखा’मध्ये दाखवत आहात. पण या एका तासाच्या भागात ते का दाखवत नाहीयेत?”

हेही वाचा – Video: वर्षा उसगांवकर ‘या’ सदस्याला म्हणाल्या सेक्सी, अरबाजने सांगितला घरच्यांना किस्सा, पाहा व्हिडीओ

डीपीची आई म्हणाली की, धनंजय जे काही बोलतोय ते ‘बिग बॉस’ने दाखवायला पाहिजे, असं आमचं म्हणण आहे. हे मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत, असं स्पष्ट धनंजय पोवारच्या पत्नीने सांगितलं. दोघींचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. अनेकांनी दोघींच्या मताला सहमती दर्शवली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhananjay powar wife and mother expressed displeasure accusing of bigg boss marathi pps