मराठी नाटक हा मराठी माणसाचा श्वास आहे असं म्हंटल जात. गेली दोन वर्ष करोनामुळे नाट्यसृष्टी ठप्प होती मात्र पुन्हा एकदा रंगभूमी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सुसज्ज झाली आहे. मराठी नाटक म्हंटल की एक नाव हमखास येत ते म्हणजे प्रशांत दामले. गेली अनेकवर्ष ते सातत्याने विविध नाटकांमधून ते प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. अभिनेता प्रसाद ओक याने प्रशांत दामलेंबद्दल एक पोस्ट लिहली आहे.
प्रशांत दामले यांनी नुकतीच महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमच परीक्षक प्रसाद ओकने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कार्यक्रमाचा एक प्रोमो टाकला आहे. ज्यात प्रशांत दामलेदेखील हास्यजत्रेच्या कलाकारांबरोबर विनोदी स्किट करताना दिसून येत आहेत. प्रसादने पोस्टमध्ये लिहले आहे, ‘आणि प्रशांत दामले हास्यजत्रेच्या मंचावर खरंच या माणसाला रंगमंचावर पाहिल्यानंतर सुख म्हणजे नक्की काय असतं? हा प्रश्न मला कधीच पडत नाही. १२५०० व्या प्रयोगासाठी मनःपूर्वक अभिनंदन आणि अंत कोटी शुभेच्छा’!! अशा शब्दात प्रसादने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मलायकाला अर्जुन कपूरने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, रोमँटिक फोटो शेअर करत म्हणाला, माझीच…
प्रशांत दामले यांनी त्यांच्या विनोदीबुद्धीने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक मराठी नाटकांमध्ये काम केले आहे. त्याबरोबर ते खवय्यांसाठीचे असलेले खास कार्यक्रम नेहमीच रंगवताना दिसतात. प्रशांत दामले सध्या वर्ष उसगावकर यांच्याबरोबर ‘सारखं काहीतरी होतंय’ या नाटकात दिसत आहेत. अनेक वर्षांनंतर ही जोडी रंगमंचावर दिसत आहे प्रेक्षक देखील त्यांच्या जोडीला पसंत करत आहेत.
महाराष्ट्राची हास्यजत्रा’ च्या मंचावर प्रशांत दामले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. दिवाळी निमित्त हा प्रशांत दामले विशेष भाग सोमवारी, २४ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता प्रेक्षकांना ‘सोनी मराठी’ वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.