Aly Goni on Breakup: क्रिकेटपटू हार्दिक पंड्याने (Hardik Pandya Divorce) काही दिवसांपूर्वी पत्नी नताशापासून (Natasa Stanković) घटस्फोट घेतल्याची घोषणा केली. चार वर्षांच्या संसारानंतर हे जोडपं वेगळं झालं. या दोघांना एक मुलगा आहे. हार्दिकच्या प्रेमात पडण्याआधी नताशा अभिनेता अली गोनीला डेट करत होते, दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. अली गोनीने आता त्याच्या आधीच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे, यात त्याने नताशाचं नाव घेतलं नसलं तरी त्याचा रोख तिच्याचकडे असल्याचं म्हटलं जात आहे.
हार्दिक पंड्याची गर्लफ्रेंड होण्यापूर्वी नताशा अलीला डेट करत होती. दोघांनीही ‘नच बलिए’ शोच्या नवव्या पर्वात भाग घेतला होता. पण हा शो संपल्यानंतर दोघे वेगळे झाले. नताशा किंवा अली दोघेही कधीच त्यांच्या ब्रेकअपबद्दल बोलले नाही. आता अलीने यावर मौन सोडलं आहे. अली गोनी आता अभिनेत्री जास्मिन भसीनला डेट करत आहे, यापूर्वी तो नताशासोबत रिलेशनशिपमध्ये होता.
सेटवरचं प्रेम, वयात १४ वर्षांचे अंतर अन् कडाक्याची भांडणं; अभिनेता म्हणाला, “एका क्षणी मला वाटलं…”
अली गोनी ब्रेकअपबद्दल म्हणाला…
अली गोनीने नुकतीच भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. यावेळी त्याने नताशाचं नाव घेतलं नाही पण आधीचं रिलेशनशिप असा उल्लेख करत ब्रेकअप का झालं, त्याचं कारण सांगितलं. “यापूर्वी मी ज्या रिलेशनशिपमध्ये होतो, ते गंभीर होतं. तिने मला म्हटलं की आपण लग्न केल्यावर वेगळे राहू, ती गोष्ट मला आवडली नाही, हेच ब्रेकअपचं कारण होतं,” असं अली म्हणाला.
२० सिनेमे फ्लॉप, १३ वर्षे चित्रपटांपासून दूर; बॉलीवूड अभिनेता तरीही कमावतो बक्कळ पैसे, करतो ‘हे’ काम
कुटुंबाला सोडू शकत नाही – अली
अली गोनी म्हणाला की त्याला कुटुंबाबरोबर राहायला आवडतं, त्याला त्यांच्यापासून वेगळं राहायचं नाही. “मी जिथे जाईन तिथे माझ्या कुटुंबाला सोबत नेईन. मी माझ्या कुटुंबापासून वेगळं राहू शकत नाही. जगातील कोणीही प्रयत्न केले तरी मी माझ्या कुटुंबाला सोडू शकत नाही,” असं अलीने नमूद केलं.
अलीने ब्रेकअपबद्दल सांगितलं असलं तरी बोलताना त्याने नताशाचं नाव एकदाही घेतलं नाही, मात्र तो तिच्याबद्दलच बोलत असल्याचं म्हटलं जात आहे. कारण नताशाशी ब्रेकअप झाल्यावर तो अभिनेत्री जास्मिन भसीनला डेट करत आहे. दोघांची जोडी चाहत्यांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. दुसरीकडे अलीशी ब्रेकअप झाल्यावर नताशा क्रिकेटपटू हार्दिक पंड्याच्या प्रेमात पडली. त्या दोघांनी करोना काळात लग्न केलं, त्यानंतर शाही थाटात हिंदू व ख्रिश्चन पद्धतीने लग्नगाठ बांधली होती. या वर्षाच्या सुरुवातीपासून या दोघांच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा होती. अखेर जुलै महिन्यात हार्दिक व नताशा दोघांनी पोस्ट करून घटस्फोट घेतल्याची माहिती दिली.