आपल्या अभिनयाने मालिका, चित्रपटांमध्ये वेगळी छाप सोडणारा अभिनेता म्हणजे पुष्कराज चिरपुटकर. दिल दोस्ती दुनियादारी मालिकेतून पुष्कराजला खरी ओळख मिळाली. या मालिकेत त्याने आशुतोष शिवलकरची भूमिका चांगलीच गाजली होती. नुकतंच एका मुलाखतीत पुष्कराजने त्याच्या लग्नाबाबत भाष्य केलं आहे.
काही दिवासांपूर्वी दिल दोस्ती दुनियादारी फेम अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने गायक आशिष कुलकर्णीबरोबर साखरपुडा केला. सोशल मीडियावर पोस्ट शेअऱ करत स्वानंदीने प्रेमाची कबूली दिली होती. आता स्वानंदीपाठोपाठ पुष्कराजही लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा सुरु आहे. आता खुद्द पुष्कराजने त्याच्या लग्नाबाबत खुलासा केला आहे.
पुष्कराज म्हणाला, “माझा सध्या लग्नाबाबत सध्या विचार नाहीये. नवरा व्हायच आहे की नाही हे कळत नाहीये. किरकोळ मी कधीही असतोच. कोणाच्याही आयुष्यात गेलो तरी मी किरकोळ असतोच हे मी मान्य केलं आहे. त्यामुळे नवरा झालो तरी मी किरकोळच होणार यात काही शंका नाही.”
पुष्कराजने आत्तापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. नुकतचं त्याचं ‘किरकोळ नवरे’ नावाचं नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या नाटकात त्याच्याबरोबर अभिनेत्री अनिता दाते प्रमुख भूमिकेत आहे. २०११ साली प्रदर्शित झालेल्या आजोबा वयात आले या चित्रपटातून पुष्कराजने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर ‘टीटीएमएम’, ‘मुंबई डायरीज’ २६/११, ‘मी वसंतराव’ चित्रपटांमधील त्याची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. दिल दोस्ती दुनियादारी मालिकेतील त्याच्या भूमिकेसाठी पुष्कराजला झी मराठीचे पारितोषिकही मिळाले होते. चित्रपट आणि मालिकांशिवाय पुष्कराजने . ‘गजर माऊलीचा उत्सव कीर्तनाचा’ तसेच ‘बँड बाजा वरात’ सारख्या अनेक कार्यक्रमांचे सुत्रसंचालनही केलं आहे.