‘दिल दोस्ती दुनियादारी’ ही मालिका छोट्या पडद्यावर प्रचंड लोकप्रिय ठरली. २०१५ मध्ये या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या मालिकेच्या निमित्ताने अमेय वाघ, सुव्रत जोशी, सखी गोखले, स्वानंदी टिकेकर, पुष्कराज चिरपूटकर, पूजा ठोंबरे हे कलाकार घराघरांत लोकप्रिय झाले. आजही ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेचे नवे पर्व सुरु करा अशी मागणी प्रेक्षकवर्गाकडून सातत्याने केली जाते. यासदंर्भात नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मालिकेच्या मुख्य कलाकारांनी भाष्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : “जावईबापू जिंदाबाद”, सासरहून प्रवीण तरडेंना मिळालं अधिकमासाचं वाण, पत्नीने शेअर केला व्हिडीओ

अलीकडेच मालिकेच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी काही प्रमुख कलाकारांनी केक्राफ्टच्या मुलाखतीला हजेरी लावली होती. या वेळी अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने या मालिकेमुळे यातील प्रमुख कलाकारांच्या जीवनात कसा बदल झाला? अशा अनेक गोष्टी प्रेक्षकांना सांगितल्या. अभिनेत्री म्हणाली, “सुरुवातीला आमच्या मालिकेचा टीआरपी अजिबात जास्त नव्हता किंवा मालिकेचा टीआरपी छप्परफाड आहे अशा कोणत्याच गोष्टी नव्हत्या. आम्हाला पहिल्यांदाच १०.३० ची वेळ मिळाली होती. तरीही प्रेक्षकांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला.”

हेही वाचा : सुश्मिता सेनची ‘ताली’ वेबसीरिज पाहिल्यानंतर हेमंत ढोमेची पोस्ट, म्हणाला “फारच…”

अभिनेत्री पुढे म्हणाली, “दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेमुळे आम्ही सगळे आज टिव्ही माध्यमाचा प्रचंड आदर करतो. टिव्ही माध्यमाचा आदर करायला आम्हाला ‘दिल दोस्ती’ने शिकवलं. तुम्ही जेव्हा टिव्हीवर काम करत असता तेव्हा तुमची तब्येत ठिक असू दे किंवा नसू दे…तुम्हाला चेहऱ्याला रंग लावून कॅमेऱ्यासमोर उभं राहावं लागतं. तर, अशा परिस्थितीत टिव्ही माध्यमावर काम कसे करायचे हे आम्हाला ‘दिल दोस्ती’ने शिकवले.”

हेही वाचा : “लेकीचं संगोपन आणि काम एकत्र कसं सांभाळतेस?” आलिया भट्टच्या उत्तराने वेधलं लक्ष, अभिनेत्रीचे विचार वाचून तुम्हीही कराल कौतुक

दरम्यान, ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतील सगळ्याच कलाकारांनी आजच्या घडीला मनोरंजनसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्वानंदी टिकेकरने ‘दिल दोस्ती…’नंतर आणखी दोन मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारली होती. सध्या अभिनेता सुव्रत जोशीच्या ‘ताली’ आणि अमेय वाघच्या ‘असुर’ वेब सीरिजला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dil dosti duniyadari fame swanandi tikekar talks about working on tv medium sva 00
Show comments