Dilip Joshi- Asit Modi: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेचे मुख्य कलाकार दिलीप जोशी व निर्माते असित मोदी यांच्यात भांडण झाल्याच्या बातम्या येत आहेत. दोघांमध्ये सेटवर भांडण झाले, दिलीप जोशी चिडले आणि त्यांनी रागात निर्माते असित मोदी यांची कॉलर धरली, असे वृत्त न्यूज १८ ने दिले. यावर खुद्द दिलीप जोशी यांनीच प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेली १६ वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेत दिलीप जोशी हे ‘जेठालाल गडा’ नावाचे मुख्य पात्र साकारत आहेत. दिलीप यांचे सुट्ट्यांवरून असित यांच्याशी भांडण झाले. ते बोलत असताना असित यांनी संभाषण टाळण्याचा प्रयत्न केला. ते दिलीप जोशी यांच्याकडे दुर्लक्ष करून कुश शाहला भेटायला गेले, त्यामुळे दिलीप यांना अपमानास्पद वाटलं. त्यानंतर चिडलेल्या दिलीप जोशींनी असित मोदींची कॉलर देखील धरली होती आणि ते शो सोडणार आहेत, असे वृत्त समोर आले होते. अखेर दिलीप जोशी यांनीच या चर्चांवर मौन सोडले आहे.

हेही वाचा – दिलीप जोशी-असित मोदी यांच्या भांडणाच्या वृत्तावर ‘आत्माराम भिडे’ची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “आम्ही सर्वजण…”

दिलीप जोशी यांनी फेटाळले भांडणाचे वृत्त

इंडिया टुडेशी बोलताना दिलीप जोशी म्हणाले, “मला फक्त या सर्व अफवा दूर करायच्या आहेत. माझ्या आणि असित भाईबद्दल माध्यमांमध्ये काही बातम्या आल्या आहेत, ज्या पूर्णपणे खोट्या आहेत. अशा गोष्टी बोलल्या जातात हे पाहून मला खूप वाईट वाटतं. तारक मेहता का उल्टा चष्मा हा शो माझ्यासाठी आणि लाखो चाहत्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा लोक अशा अफवा पसरवतात तेव्हा फक्त आम्हालाच नाही तर आमच्या प्रेक्षकांनाही त्रास होतो.”

हेही वाचा – कश्मीरा शाहचा अपघात कसा झाला, आता प्रकृती कशी आहे? तिची नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली…

पुढे ते म्हणाले, “इतक्या वर्षांपासून अनेकांना भरभरून आनंद देणाऱ्या एखाद्या गोष्टीबद्दल नकारात्मकता पसरवली जाते हे पाहून खूप वाईट वाटतं. प्रत्येक वेळी अशा अफवा येतात आणि त्या खोट्या असल्याचं स्पष्टीकरण आम्हाला द्यावं लागतं, हे निराशाजनक आणि वैताग आणणारं आहे. कारण फक्त आम्हीच नाही तर ज्यांना हा शो आवडतो, ते सर्वजण अशा बातम्या वाचून अस्वस्थ होतात.”

हेही वाचा – “बॉलीवूड कलाकार दारूची…”, दिलजीत दोसांझची ‘त्या’ नोटीसनंतर टीका; सरकारला आव्हान देत म्हणाला…

शो सोडण्याबद्दल दिलीप जोशी म्हणाले…

दिलीप जोशी यांनी शो सोडण्याच्या अफवाही फेटाळल्या. “याआधीही मी शो सोडल्याच्या अफवा होत्या, त्या पूर्णपणे खोट्या होत्या. आणि आता असं वाटतंय की दर काही आठवड्यांनी असित भाई आणि शोला कोणत्या ना कोणत्या प्रकारे बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यासाठी अशी कथा रचली जातेय. अशा गोष्टी पुन्हा-पुन्हा घडताना पाहून वाईट वाटतं. पण शोला इतकं यश मिळतंय त्याचा कोणाला तरी हेवा वाटतोय, त्यामुळे ते या गोष्टी करत आहेत,” असं दिलीप जोशी म्हणाले.

“या सगळ्या गोष्टी कोण पसरवतंय हे मला माहीत नाही, पण मी हे स्पष्ट करतोय की मी मालिकेच्या सेटवर आहे. रोज तेवढ्याचं प्रेमाने मी या शोसाठी काम करतोय. मी कुठेही जाणार नाही. मी खूप वर्षांपासून या सुंदर प्रवासाचा एक भाग आहे आणि मी यापुढेही त्याचा एक भाग राहीन,” असं दिलीप जोशी म्हणाले.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dilip joshi breaks silence on fight rumours with producer asit modi hrc