टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते दिलीप जोशी यांनी जेठालाल या व्यक्तिरेखेने लोकांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेद्वारे त्यांच्या चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेपूर्वी दिलीप जोशी यांनी चित्रपटांमध्येही काम केले आहे. मात्र, एका चित्रपटासाठी दिलीप यांनी केवळ दीड महिन्यात १६ किलो वजन कमी केले होते. नुकत्याच एका मुलाखतीत दिलीप यांनी याबाबतचा खुलासा केला आहे.

Mashable India ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान दिलीप जोशी म्हणाले, ‘मी एक गुजराती चित्रपट केला होता. त्याचे शीर्षक ‘हूं हूंशी हुंशीलाल’ असे होते. हा एक फेस्टिव्हल प्रकारचा चित्रपट होता, ज्यात ३५ ते ३६ गाणी होती. हा एक राजकीय व्यंगचित्र प्रकारचा चित्रपट होता. चित्रपटातील भूमिकेसाठी मला माझे वजन कमी करावे लागले होते.

bigg boss marathi mira jagannath slams ankita walawalkar
“असं नको खेळू, तसं नको…”, सूरजला सल्ले देणाऱ्या अंकितावर मराठी अभिनेत्री संतापली; ‘तो’ व्हिडीओ शेअर करत म्हणाली…
bigg boss marathi utkarsh shinde praises arbaz patel
“मिस्टर युनिव्हर्सला धाप लागली…”, संग्रामला टोला, तर अरबाजच्या…
Appi Aamchi Collector
Video: ‘अप्पी आमची कलेक्टर’मध्ये मोठा ट्विस्ट; अप्पी आणि अर्जुन होणार वेगळे, अमोलची देवाला प्रार्थना म्हणाला, “मला काही झालं…”
Bigg Boss Marathi 5
Video: “ऐकून घेण्याची क्षमता…”, वर्षा उसगांवकर अन् धनंजय पोवारमध्ये जोरदार भांडण; पाहा नेमकं घडलं काय?
lakhat ek amcha dada fame actor nitish chavan and artist dance with director watch video
Video: ‘लाखात एक आमचा दादा’मधील कलाकारांचा दिग्दर्शकाबरोबर मजेशीर व्हिडीओ, अविनाश नारकर म्हणाले, “कामाबरोबर अशी मजा…”
tharala tar mag sayali recreate the scene of accident
ठरलं तर मग : तन्वीSSSS…; २२ वर्षांनी पुन्हा तोच अपघात! प्रतिमाची स्मृती परत येईल का? सायलीच्या योजनेमुळे मालिकेत मोठा ट्विस्ट
actress Sana Sayyad Announces Pregnancy
एकाच मालिकेतील आणखी एका अभिनेत्रीने दिली गुड न्यूज, बेबी बंपचे फोटो केले शेअर, तीन वर्षांपूर्वी केलंय लग्न
bigg boss marathi these four contestant out from the captaincy task
Bigg Boss Marathi : कॅप्टन्सी कार्यात धक्काबुक्की! घरातील ‘हे’ चार सदस्य टास्कमधून झाले बाद, ‘त्या’ फोटोमुळे झालं उघड
Ankita Walawalkar And Suraj Chavan
Video: “नीट सांगायचं…”, अंकिता वालावलकरने समजावल्यानंतर सूरज चव्हाण म्हणाला, “मला गरज नाही…”

हेही वाचा- “आर्यनपेक्षा शाहरुख खान…” भर कार्यक्रमात विचारलेल्या ‘त्या’ प्रश्नावर गौरी खानचे थेट उत्तर

दिलीप जोशी पुढे म्हणाले की, त्या वेळी ते काम करायचे आणि चित्रपटातील भूमिकेसाठी तयारीही करत होते. त्या दिवसांत मी माझी स्कूटर उभी करायचो आणि मग स्विमिंग क्लबमध्ये कपडे बदलल्यानंतर मरीन ड्राईव्हवरील ओबेरॉय हॉटेलपर्यंत पावसात जॉगिंग करून परत जायचो. त्यासाठी ४५ मिनिटे लागायची. अशा प्रकारे मी दीड महिन्यात माझे १६ किलो वजन कमी केले.

हेही वाचा- The Kerala Story : ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई, १२ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी

अभिनेता होण्याआधी पाच वर्षे ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम केल्याचेही दिलीप जोशी यांनी सांगितले. हे काम त्यांनी १९८५ ते १९९० या काळात केले. ‘हूं हूंशी हुंशीलाल’ हा गुजराती राजकीय व्यंगचित्रपट होता, ज्यामध्ये दिलीप जोशींव्यतिरिक्त रेणुका शहाणे, मनोज जोशी आणि मोहन गोखले या कलाकारांनी काम केले होते.