टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते दिलीप जोशी यांनी जेठालाल या व्यक्तिरेखेने लोकांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेद्वारे त्यांच्या चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेपूर्वी दिलीप जोशी यांनी चित्रपटांमध्येही काम केले आहे. मात्र, एका चित्रपटासाठी दिलीप यांनी केवळ दीड महिन्यात १६ किलो वजन कमी केले होते. नुकत्याच एका मुलाखतीत दिलीप यांनी याबाबतचा खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Mashable India ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान दिलीप जोशी म्हणाले, ‘मी एक गुजराती चित्रपट केला होता. त्याचे शीर्षक ‘हूं हूंशी हुंशीलाल’ असे होते. हा एक फेस्टिव्हल प्रकारचा चित्रपट होता, ज्यात ३५ ते ३६ गाणी होती. हा एक राजकीय व्यंगचित्र प्रकारचा चित्रपट होता. चित्रपटातील भूमिकेसाठी मला माझे वजन कमी करावे लागले होते.

हेही वाचा- “आर्यनपेक्षा शाहरुख खान…” भर कार्यक्रमात विचारलेल्या ‘त्या’ प्रश्नावर गौरी खानचे थेट उत्तर

दिलीप जोशी पुढे म्हणाले की, त्या वेळी ते काम करायचे आणि चित्रपटातील भूमिकेसाठी तयारीही करत होते. त्या दिवसांत मी माझी स्कूटर उभी करायचो आणि मग स्विमिंग क्लबमध्ये कपडे बदलल्यानंतर मरीन ड्राईव्हवरील ओबेरॉय हॉटेलपर्यंत पावसात जॉगिंग करून परत जायचो. त्यासाठी ४५ मिनिटे लागायची. अशा प्रकारे मी दीड महिन्यात माझे १६ किलो वजन कमी केले.

हेही वाचा- The Kerala Story : ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई, १२ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी

अभिनेता होण्याआधी पाच वर्षे ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम केल्याचेही दिलीप जोशी यांनी सांगितले. हे काम त्यांनी १९८५ ते १९९० या काळात केले. ‘हूं हूंशी हुंशीलाल’ हा गुजराती राजकीय व्यंगचित्रपट होता, ज्यामध्ये दिलीप जोशींव्यतिरिक्त रेणुका शहाणे, मनोज जोशी आणि मोहन गोखले या कलाकारांनी काम केले होते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dilip joshi reduced 16 kg weight in one and a half month for roal in gujrati film dpj
Show comments