‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही विनोदी मालिका वर्षानुवर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते. या मालिकेतील सर्वच पात्रांचे वेगळे वैशिष्ट्य पाहायला मिळते. भिडेमास्तर, जेठालाल गडा, अय्यर, बापूजी, टप्पू सेना मालिकेतील अशी अनेक पात्रे प्रेक्षकांची लाडकी आहेत. तसेच, मालिकेतील काही डायलॉग्जही प्रसिद्ध झाल्याचे पाहायला मिळाले. आता जेठालाल गडा ही भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी यांनी मालिकेतील एका डायलॉगवर बंदी घातली असल्याचा खुलासा केला आहे.
दिलीप जोशी काय म्हणाले?
लोकप्रिय अभिनेते दिलीप जोशी यांनी नुकतीच सौरभ पंत यांच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत त्यांनी मालिकेतील त्यांच्या एका गाजलेल्या डायलॉगविषयी खुलासा केला. दीपक जोशी म्हणाले की, ‘ये पागल औरत’ हा डायलॉग कधी स्क्रिप्टमध्येच नव्हता. तो स्वत: त्या स्क्रिप्टमध्ये घेतला होता. मालिकेतील जेठालालची बायको जेव्हा दया जेव्हा काहीतरी वेगळ्या गोष्टी करत असे, तेव्हा जेठालाल हा डायलॉग म्हणत असे. प्रेक्षकांना जेठालाल व दया यांची ही छोटी-मोठी भांडणे आवडत असत. पुढे दिलीप जोशी यांनी सांगितले की हा डायलॉग प्रेक्षकांना आवडला असला तरी काही जणांनी यावर आक्षेप घेतला. काही महिला संघटनानी हा डायलॉग महिलांचा अनादर करीत असल्याचे म्हटले. त्यामुळे ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’च्या निर्मात्यांनी तो डायलॉग वगळण्याचा निर्णय घेतला”, अशी आठवण दिलीप जोशी यांनी सांगितली.
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतील या संवादावर बंदी घातली असली तरी आजही या डायलॉगवर मीम्स बनताना दिसतात. या मालिकेत दयाबेनची ही भूमिका अभिनेत्री दिशा वाखानीने साकारली होती. मात्र, २०१७ मध्ये दिशाने हा शो सोडला. त्यानंतर चाहत्यांकडून दिशा कधी परतणार, असेही विचारले गेले आहे. जेठा व दयाबेन यांच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केल्याचे पाहायला मिळाले. दयाबेनचा साधेपणा, बोलण्याची हटके स्टाईल, गरबा, टप्पूवरचे प्रेम आणि जेठालाल व दयाबेनमधील कुरबुरी प्रेक्षकांची मने जिंकून घेतल्याचे पाहायला मिळाले. आजही प्रेक्षक या जोडीला एकत्र बघण्यासाठी उत्सुक आहेत. तारक मेहता का उल्टा चश्मा हा शो २००८ मध्ये सुरू झाला आहे. ,त्यामध्ये जेठालाल, दयाबेन गडा, तारक मेहता, टपू, चंपकलाल गडा, बबिता अय्यर, क्रिशनन अय्यर, आत्माराम तुकाराम भिडे, माधवी आत्माराम भिडे, पोपटलाल, कोमल हाथी अशी अनेक पात्रे पाहायला मिळतात.