Celebrity MasterChef : ‘सोनी टेलिव्हिजन’ वाहिनीवरील ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ कार्यक्रमाची दिवसेंदिवस लोकप्रियता वाढताना दिसत आहे. या कार्यक्रमातील स्पर्धकांनी वेगवेगळे पदार्थ बनवून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. काही दिवसांपूर्वी ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून ९०च्या दशकातील बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री आयेशा झुलकाची एन्ट्री झाली. त्यानंतर अभिजीत सावंत एविक्ट झाला. आता एका स्पर्धकाने अचानक ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ कार्यक्रमाला रामराम केल्याचं समोर आलं आहे. याबाबत उषा नाडकर्णी ( Usha Nadkarni ) यांनी स्वतः सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘ससुराल सिमर का’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली, ‘बिग बॉस’च्या १२व्या पर्वाची विजेती दीपिका कक्करने ( Dipika Kakkar ) ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला आहे. चार वर्षानंतर दीपिका कक्करने टेलिव्हिजनवर कमबॅक केलं होतं. पण तिने आता ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ कार्यक्रमाला रामराम केला आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

दीपिकाने ( Dipika Kakkar ) अचानक ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ सोडण्यामागचं कारण उषा नाडकर्णी यांनी सांगितलं आहे. ‘आजतक’ वृत्तसंस्थेशी संवाद साधताना उषा नाडकर्णी म्हणाल्या, “दीपिकाची तब्येत ठीक नाहीये. तिला हाताचा खूप त्रास होतो आहे. त्यामुळे तिने ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ कार्यक्रम सोडला आहे. मध्यंतरी ती एकदा कार्यक्रमा बाहेर गेली होती. तेव्हा डॉक्टरकडे गेल्यानंतर सर्वकाही ठीक झाल्यानंतर ती परत आली. मग पुन्हा तिला त्रास होऊ लागला. त्यामुळे ती आता परत येणार नाही. सतत कार्यक्रमा बाहेर जा, कार्यक्रमामध्ये या, हे चांगलं वाटतं नाही. लोक काय म्हणतील? हा विचार करून तिने ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ कार्यक्रमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.”

माहितीनुसार, दीपिका कक्कर ( Dipika Kakkar ) होळी स्पेशल भागाचं चित्रीकरण करेल. त्यानंतर ती ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्ये दिसणार नाही. दीपिकाला हाताचा खूप त्रास होतोय. त्यामुळे तिने काळजीखातर ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी दीपिकाचा पती शोएब इब्राहिमने एका व्लॉगमध्ये सांगितलं होतं की, दीपिकाच्या हाताला दुखापत झाली होती. ज्याचा त्रास बऱ्याच काळानंतर तिला पुन्हा उद्भवला आहे. डॉक्टरांनी तिला पूर्णपणे आराम करण्याचा सल्ला दिला आहे.