‘ससुराल सिमर का’ या मालिकेमुळे अभिनेत्री दीपिका कक्कर घराघरांत पोहोचली. दीपिका तिच्या कामामुळे कायमच चर्चेत राहिली. पण तिच्या वैवाहिक आयुष्याबाबतही अनेक चर्चा रंगल्या. अभिनेता शोएब इब्राहिम याच्याबरोबर तिने दुसरं लग्न केलं. आता दीपिका गरोदर आहे. दोघंही सुखाचा संसार करत आहे. पण पहिल्या लग्नामुळे बराच त्रास सहन करावा लागला असल्याचं दीपिकाने सांगितलं होतं.
दीपिकाने २०११ मध्ये पायलट रौनक सॅमसनशी लग्न केलं होतं. दीपिकानेही आधी जेट एअरवेजमध्ये नोकरी केली. मात्र तीन वर्षांमध्येच तिने ही नोकरी सोडली. दीपिका व रौनकचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. लग्नाच्या चार वर्षांमध्येच दोघं एकमेकांपासून विभक्त झाले. २०१५मध्ये दीपिका व रौनकचा घटस्फोट झाला.
आणखी वाचा – “आज त्याच्याकडे फेम आहे पण…” एमसी स्टॅनच्या वागणुकीवर भडकले पुण्याचे गोल्डन बॉईज, म्हणाले, “गर्व…”
दीपिका व रौनक विभक्त होण्यामागे शोएब कारणीभूत असल्याचं बोललं जातं. ‘ससुराल सिमर का’ मालिकेदरम्यान दीपिका व शोएबमध्ये जवळीक वाढली आणि त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला असल्याची चर्चा होती. मात्र दीपिकाने हे सगळं खोटं असल्याचं म्हटलं होतं. पहिल्या लग्नामध्ये तिला मानसिक त्रास होत होता असं दीपिकाचं म्हणणं होतं. म्हणूनच तिने रौनकपासून विभक्त होण्याच निर्णय घेतला.
आणखी वाचा – “लोकांना असं वाटतं की, आमच्याकडे खूप पैसे आहेत पण…” वनिता खरातचा खुलासा, म्हणाली, “माझे आई-वडील अजूनही…”
इतकंच नव्हे तर दीपिकाने २०१८ मध्ये इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर शोएब इब्राहिमशी लग्न केलं. तिने तिचं नाव बदलून फैजा ठेवलं होतं. आता दीपिका सुखाचा संसार करत असली तरी रौनकने मात्र पुन्हा दुसरं लग्न केलं नाही. रौनक सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतो. तो सध्या त्याच्या आईबरोबर राहतो. तसेच मित्र मंडळींबरोबर धमाल मस्तीही करताना दिसतो.