टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्करने काही महिन्यांपूर्वीच तिच्या प्रेग्नन्सीची घोषणा केली. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिने याची माहिती चाहत्यांनी दिली होती. मात्र आता यावरूनही ट्रोल करणाऱ्यांवर दीपिकाने संताप व्यक्त केला आहे आणि त्यांना चांगलंच सुनावलंही आहे. नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये दीपिकाने काही लोकांनी तिच्या प्रेग्नन्सीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचा खुलासा केला आहे. दीपिका खोट्या प्रेग्नन्सीचं नाटक करत आहे आणि खोटा बेबी बंप फ्लॉन्ट करत असल्याचा आरोप काही नेटकऱ्यांनी तिच्यावर केला होता. आता यावर दीपिकाने नाराजी व्यक्त करत त्यांना खडे बोल सुनावले आहेत.

दीपिका कक्करने तिच्या युट्यूब व्लॉगमधून नकारात्मक कमेंट्स करणाऱ्या युजर्सवर संताप व्यक्त केला आहे. दीपिकाने या व्हिडीओमध्ये सांगितलं की शोएब आणि तिच्या लग्नाच्या पाचव्या वाढदिवशी अनेक युजर्सनी या दोघांवर खूपच वाईट पद्धतीने कमेंट्स केल्या आहेत. शोएबने लग्नाचा वाढदिवस साजरा न केल्याने अनेक लोकांनी तर त्यांच्या पती पत्नीच्या नातेसंबंधांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

Shocking video Man beat up girlfriend on road video goes viral on social media
“हे कसलं प्रेम? घरी आई-वडिलांचा एक शब्दही ऐकून न घेणाऱ्या मुली बॉयफ्रेंडचा मार कसा खातात?” धक्कादायक VIDEO व्हायरल
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
ladies group dance on marathi song kakhet kalasa gavala valsa kashala marathi old song video goes viral
“काखेत कळसा गावाला वळसा कशाला?” जुन्या मराठी गाण्यावर महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून म्हणाल “नाद पाहिजे फक्त”
Brother uses Polaroid camera for sisters photoshoot
मी तुझे फोटो काढू का?’ भावाने लाडक्या बहिणीचे केले फोटोशूट; प्रेमळ VIDEO पाहून म्हणाल, ‘भाऊ असावा तर असा!’
Viral Girl Shravanis New Video
मित्रांची साथ सोडून देण्याचा चिमुकलीने दिला सल्ला; पण ‘ती’ असं का म्हणाली? Viral Video तून बघा
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
Ajit Pawar and Suresh Dhas
Ajit Pawar : सुरेश धस यांनी उल्लेख केलेली मुन्नी कोण? विचारताच अजित पवार संतापून म्हणाले, “असल्या फाल्तू…”
Maharashtra need Chhatrapati Shivaji Maharaj
Video : महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे! तरुणीने कवितेतून सांगितले दु:ख; म्हणाली, “शिवराज्याचे फक्त धडे वाचले आम्ही…”

आणखी वाचा- आधी घटस्फोट, नंतर पतीसाठी बदलला धर्म आणि गर्भपात… प्रेग्नन्सीनंतर दीपिकाच्या पतीने केला मोठा खुलासा

दीपिका म्हणाली, “शोएब एक अभिनेता आहे. एक टीव्ही अभिनेता असणं खूपच कठीण असतं. कारण, मालिकेच्या अर्ध्या तासाच्या एका एपिसोड मागे खूप लोकांची मेहनत असते. अशा वेळी जे लोक नकारात्मक कमेंट्स करतात ते कोणत्याही प्रकारचं सत्य जाणून घेण्याची मेहनत घेत नाहीत आणि कोणत्याही सबळ पुराव्यांशिवाय काहीही बोलू लागतात. एवढंच नाही तर आता लोक माझा भूतकाळही यात खेचत आहेत. मी भूतकाळात कोणत्या दुःखांना सामोरी गेले आहे याबद्दल कोणाला काय माहीत आहे.”

ती पुढे म्हणाली, “माझ्या आयुष्यात माझा अभिमानच शोएब आहे. मी तर माझ्या पतीचं कौतुक करणारच. शोएबचं माझ्यावर खूप प्रेम आहे. तुम्ही एखाद्याबद्दल नकारात्मक बोलता तेव्हा त्यासाठी एक मिनिटही लागत नाही. आता तर तुम्ही म्हणता की आली ही अॅक्टिंग करायला. तर असं तर आपण सगळेच करतो.”

आणखी वाचा- “मी येत्या वर्षात…” पत्नीच्या वाढदिवशी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने तिला दिलं मोठं वचन, पोस्ट चर्चेत

दीपिकाने तिच्या व्लॉगमध्ये अशा काही कमेंट्स वाचून दाखवल्या ज्यामुळे तिला सगळ्यात जास्त राग आला आणि दुःख झालं. त्यात एका युजरने लिहिलं होतं, “अचानक तब्येत खराब होते. मग ठीक होते, त्यानंतर अचानक शॉपिंगला जातात. तब्येत आहे की रंग बदलणारा सरडा.” दीपिका म्हणाली, “काहींनी तर मी प्रेग्नन्सीचं नाटक करतेय असाही आरोप केला आहे. पण मला तुम्हाला विचारायचं आहे की, हे सगळं तुमच्याबरोबर घडत नाही का?” अर्थात अशाप्रकारे नकारात्मक कमेंट्स करणाऱ्या युजर्समध्ये काही युजर्स असेही आहेत ज्यांनी दीपिकाला पाठिंबा दिला आहे.

Story img Loader