टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. दीपिका लवकरच आई होणार असून तिने याबाबतची माहिती नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दिली होती. मागच्या बऱ्याच काळापासून दीपिकाच्या प्रेग्नन्सीची चर्चा असताना अखेर ती आई होणार असल्याचं कळताच चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सर्वजण तिला शुभेच्छा आणि आशीर्वाद देताना दिसत आहेत. पण सध्या आपल्या आयुष्यात खुश असलेल्या दीपिकाने काही वर्षांपूर्वी बरचं दुःख झेललं आहे.
दीपिका कक्करने २०१३ साली रौनक सॅमसनशी लग्न केलं होतं. रौनक एक पायलट होता. लग्नाच्या काही महिन्यानंतरच दीपिका आणि रौनक यांच्यात वाद होऊ लागले. त्यामुळे अशा नात्यात राहण्यापेक्षा त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय दीपिकाने घेतला. २०१५ मध्ये म्हणजे अवघ्या दोन वर्षांतच दीपिका आणि रौनक यांचा घटस्फोट झाला.
आणखी वाचा- गुडन्यूज! दीपिका लवकरच होणार आई, पोस्ट शेअर करत म्हणाली; “आमच्या आयुष्यात…”
दीपिका कक्कर जेव्हा तिच्या वैवाहिक आयुष्यातल्या कठीण परिस्थितीचा सामना करत होती. त्यावेळी शोएबने तिला आधार दिला. या दोघांची ओळख ‘ससुराल सिमर का’ मालिकेच्या सेटवर झाली होती. दोघांच्याही या मालिकेत मुख्य भूमिका होत्या. मालिकेच्या सेटवर दोघांची चांगली मैत्री झाली. दीपिकाच्या कठीण काळात शोएबने तिला साथ दिली आणि नंतर त्यांची मैत्री प्रेमाच्या नात्यात बदलली.
दीपिका शोएबच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. अखेर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या घटस्फोटानंतर दीपिकाने २०१८ मध्ये शोएबशी निकाह केला. या लग्नानंतर तिने धर्म बदलला आणि ती फैजा झाली. ज्यासाठी तिला सोशल मीडियावर बरंच ट्रोल केलं गेलं. मात्र तिने नेहमीच सडेतोड उत्तर देत ट्रोलर्सची बोलती बंद केली आहे.
आणखी वाचा- “तिला मोलकरीण बनवलंस”, पतीवर टीका करणाऱ्यांवर अभिनेत्री दीपिका कक्कर संतापली
आता दीपिकाच्या प्रेग्नन्सीची घोषणा करतानाच पती शोएब इब्राहिमने एक धक्कादायक खुलासा केला आहे. “मागच्याच वर्षी दीपिकाचा गर्भपात झाला होता तो काळ आम्हा दोघांसाठीही फार कठीण होता. त्यातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला वेळ लागला. त्यामुळे जेव्हा या वेळी आम्हाला दीपिकाच्या प्रेग्नन्सीबद्दल समजलं तेव्हा आम्ही तीन महिने थांबण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतरही बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली.” असं शोएब इब्राहिम म्हणाला.