Tunisha Sharma Committed Suicide: छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्माने मालिकेच्या सेटवरच गळफास घेत आत्महत्या केली आहे. सोनी सब टीव्हीवरील ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ या मालिकेत ती मुख्य भूमिका साकारत होती. शनिवारी(२४ डिसेंबर) दुपारी आत्महत्या करत तिने जीवन संपवलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर प्रसिद्ध दिग्दर्शक आनंद कुमार यांनी ट्वीट केलं आहे. “सामान्य घरातील प्रसिद्धी मिळविलेल्या प्रतिभावान, कष्ट करण्याची तयारी असलेल्या व्यक्ती आत्महत्या का करतात? त्यांच्या आई-वडिलांना कोणत्या परिस्थितीतून जावं लागेल हा विचार ते करत नाहीत का? तनुषा शर्माची बातमी ऐकल्यानंतर मी सुन्न झालो आहे”, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा>> “…ते कधीच थांबत नाहीत”; तुनिषा शर्माने आत्महत्या करण्याच्या काही तासांपूर्वीच शेअर केलेला सेटवरील व्हिडीओ

हेही पाहा>>Photos: तुनिषा शर्माने शूटिंगदरम्यानच केली आत्महत्या; मालिकेच्या सेटवर नेमकं काय घडलं?

अवघ्या २० वर्षांच्या तुनिषाने अचानक आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.  तुनिषा शर्माच्या आत्महत्येबाबत पोलीस तपास करत आहेत. सहकलाकाराच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचं समजत आहे. तुनिषा मागच्या काही दिवसांपासून नैराश्यात होती आणि तिने त्यातूनच जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे. ‘फ्री प्रेस जर्नल’ने पोलीस सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, तुनिषा गर्भवती होती आणि तिच्या प्रियकराने लग्न करण्यास नकार दिल्याने तिने आत्महत्या केली.

हेही वाचा>>“तुझ्याकडून ही अपेक्षा…”, शर्टचे बटण उघडे ठेवून बोल्ड फोटोशूट केल्यामुळे मराठी अभिनेत्री ट्रोल

तुनिषाने सलमान खान, कतरिना कैफ यांच्याबरोबर स्क्रीन शेअर केली आहे. ‘फितूर’, ‘बार बार देखो’, ‘कहानी २: दुर्गा रानी सिंह’, ‘दबंग ३’ या चित्रपटांमध्येही ती दिसली होती. तिने ‘फितूर’ आणि ‘बार बार देखो’ मध्ये तरुण कतरिना कैफची भूमिका साकारली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Director anand kumar tweet after tv actress tunisha sharma scuicide goes viral kak