‘तारक मेहता का उलटा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. गेली १४ वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतील कलाकरांवरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. या मालिकेचा दिग्दर्शक मालव राजदा याने मालिकेतून काढता पाय घेतला आहे. टीआरपीमध्ये मोठी घसरण होत चालली आहे अशी चर्चा आहे. यावरच दिग्दर्शकाच्या पत्नीने भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मालव राजदा गेली १४ वर्ष ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिकेचं दिग्दर्शन करत आहेत. त्याची पत्नी (प्रिया अहुजा) जी याच मालिकेत रिटा रिपोर्टर ही भूमिका साकारत होती. नुकतीच तिने टाइम्स ऑफ इंडिया दिलेल्या मुलाखतीत असे सांगितले की, मालिकेच्या गुणवत्तेत कोणतीही घसरण झालेली नाही. त्यापेक्षा बघणाऱ्यांच्या दृष्टीकोनातील फरकामुळे हे सर्व घडले आहे. TRP चे गणित मला कधीच कळले नाही. पण तारक मेहता ही मालिका बंद होण्याच्या मार्गावर आहे यावर माझा विश्वास नाही.” प्रतिक्रिया तिने दिली आहे.

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिकेतूनच अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळाली. या मालिकेमुळे ‘दयाबेन’ची भूमिका साकारणारी दिशा वकानी व ‘तारक मेहता’च्या भूमिकेत दिसणारे शैलेश लोढा घराघरात पोहोचले होते. या मालिकेचे चाहते आजही मालिका आवर्जून बघतात.