दिग्दर्शक रवी जाधव यांच्या ‘टाईमपास’ चित्रपटातने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. या चित्रपटातील संवादांमुळे हा चित्रपट गाजला होता. आजही प्रेक्षकांना यातील संवाद लक्षात आहेत. टाईमपासच्या यशानंतर दिग्दर्शक रवी जाधव यांनी चित्रपटाचा पुढील भाग प्रेक्षकांसाठी घेऊन आले आणि नुकताच या चित्रपटाचा तिसरा भागदेखील प्रदर्शित झाला होता. तिसऱ्या भागात ऋता दुर्गुळे दिसली होती.

‘महाराष्ट्राची क्रश’ अशी ओळख असलेल्या ऋताने छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. ‘टाईमपास ३’ चित्रपटात ती एका वेगळ्या भूमिकेत आपल्या समोर आली आहे. या चित्रपटातील गाणी, डायलॉग हे सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरदेखील चांगली कमाई केली होती. आता चित्रपट छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. ३० ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता झी मराठी वाहिनीवर हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे.

Famous painter SH Raza prakriti painting stolen from warehouse of auction house at Bellard Pier Mumbai news
प्रसिद्ध चित्रकार एस.एच. रझा यांच्या चित्राची चोरी; अडीच कोटी रुपये किंमतीच्या चित्राच्या चोरीप्रकरणी गुन्हा दाखल
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
amitabh bachchan reacting on re releasing movies
जुन्या चित्रपटांचे पुन:प्रदर्शन! अमिताभ बच्चन एव्हरग्रीन ‘शोले’बद्दल म्हणाले, “मोबाइलवर कधीही चित्रपट पाहिला नाही…”
Kangana Ranaut
कंगना रणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह; सेन्सॉर बोर्डाचे अधिकारी म्हणाले, “सर्व समुदायांच्या भावना…”
marathi actress suhasini Deshpande
व्यक्तिवेध: सुहासिनी देशपांडे
shraddha kapoor new house set become akshay kumar neighbour in juhu on rent
कोट्यवधींची मालकीण असून श्रद्धा कपूर राहणार भाड्याने; जुहूमध्ये ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याच्या शेजारी घेणार फ्लॅट
Amruta Khanwilkars marathi upcoming film like and Subscribe is coming to the theatre soon
मुहूर्त ठरला! अमृता खानविलकरचा नवीन चित्रपट ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
actress kangana ranaut praises indira gandhi during promotion of upcoming hindi film emergency
इंदिरा गांधींच्या आयुष्यातून खूप काही शिकण्यासारखं! अभिनेत्री दिग्दर्शक कंगना राणावतचे मत

IND vs PAK T20 World Cup 2022 : भारत पाक सामन्यातला शाहरुख खानचा जुना व्हिडीओ झाला व्हायरल

या चित्रपटात दगडूच्या भूमिकेत प्रथमेश परब, ऋता दुर्गुळे ही पालवी, माधव लेले उर्फ शाकाल म्हणजेच वैभव मांगले, शांताराम परब म्हणजे भाऊ कदम, आरती वडगबाळकर, दगडू गॅंग आणि पालवीच्या वडिलांच्या भूमिकेत संजय नार्वेकर बघायला मिळत आहेत.

या चित्रपटात एकूण पाच गाणी असून ती क्षितीज पटवर्धन यांनी लिहिली आहेत. तर संगीत अमितराज यांचं आहे. या चित्रपटाची कथा रवी जाधव यांची असून प्रियदर्शन जाधव याने चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशनची निर्मिती असलेल्या ‘टाइमपास ३’ चे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले आहे.