‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून ओंकार भोजनेला ओळखले जाते. ओंकार हा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. आज ओंकार भोजनेचा वाढदिवस. यानिमित्ताने अनेक कलाकार त्याला शुभेच्छा देताना दिसत आहे. ओंकार भोजनेने महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाला रामराम का केला, याबद्दल कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी मत मांडले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘कॉमेडी किंग’ अशी ओंकार भोजनेची ओळख सांगितली जाते. छोट्या पडद्यामुळे प्रसिद्धीझोतात आलेला ओंकार भोजनेचा ‘सरला एक कोटी’ हा चित्रपट नुकतंच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या काही महिन्यांपूर्वी ओंकारने झी मराठीवरील ‘फू बाई फू’ या कार्यक्रमासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या मालिकेला रामराम केला होता. यामुळे ओंकार भोजनेच्या चाहते नाराज झाल्याचे पाहायला मिळाले.
आणखी वाचा : “कार्तिकी गायकवाडमुळेच…” मुलाखतीदरम्यान आर्या आंबेकर स्पष्टच बोलली

या सर्व प्रकाराबद्दल महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी स्पष्ट मत मांडलं होतं. दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी एका मुलाखतीत ओंकार भोजने हास्यजत्रा का सोडून गेला? याबद्दलही सांगितले. “ओंकार भोजने हा उत्कृष्ट नट आहे. तो हास्यजत्रेत जेव्हा आला तेव्हाही त्याच्याकडे उत्तम क्षमता होती. त्याआधीही त्याने काही ठिकाणी काम केली होती. त्याची वैशिष्ट्यं हेरता आली आणि त्यापद्धतीने पेरता आली तर तो उत्तमच ठरणार आहे. तो एका प्रोडक्शनमधून दुसऱ्या प्रोडक्शनमध्ये जाणं यात काही गैर नाही. पण ज्या पद्धतीने लोकांनी ते मनाला लावून घेतलंय तसं मला काही फारसं वाटत नाही”, असे त्यांनी यावेळी म्हटले होते.

“एखाद्या नटाने कार्यक्रम सोडून जाणं यात काहीही अडचण नाही. ओंकार हा चित्रपटासाठी गेला होता आणि तो तेच सांगून गेला होता. आशिष पात्रे हा ओंकारचा फार चांगला मित्र आहे. त्याने त्याला सुरुवातीच्या काळात मदत केली. त्याची जाणीव ठेवणं हे आवश्यक आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा उत्तम सुरु आहे. त्यामुळे आशिषच्या प्रोडक्शनला हातभार लावूया, फेमचा थोडासा वापर करुया, या उद्देशाने आणि मित्राला मदत करण्याच्या हेतून तो कदाचित तिथे गेला असावा. पण अनेक लोकांनी पैशासाठी गेला वैगरे याबद्दल मला खरंच काहीही माहिती नाही. मला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही. त्याचे परिणाम काय होतात हा तो संच, चॅनल आणि त्यांचा अंतर्गत भाग आहे. पण आम्हाला कोणालाही त्याबद्दल काहीही राग वैगरे नाही”, असेही ते म्हणाले.

“फक्त त्याने आधी येऊन सांगितलं असतं तर बरं वाटलं असतं. यापूर्वीही त्याने असं केलं होतं. तेव्हा आम्ही त्याला जा असे सांगितले होते. त्यानंतरही तो हास्यजत्रेत आला तेव्हाच त्याचा प्रभाव पडला होता. कारण ओंकारवर फक्त एकटा तोच काम करत नाही. संपूर्ण टीम त्यावर काम करत असते. लेखकांची आठ जणांची टीम, आम्ही, सहकलाकार हे सर्वजण एकत्र येऊन एक कलाकृती तयार होते. कदाचित तो शो नवीन आहे. त्याला तिथे सेट व्हायला वेळ लागेल. तो होईल त्यात काही दुमत नाही. पण तिथला परफॉर्मन्स आणि या ठिकाणचा परफॉर्मन्स याची तुलना करण्याची माझी इच्छा नाही. पण लोक ट्रोल करतात याचं मला वाईट वाटतं. त्यांना त्यांचे स्वातंत्र्य द्यायला हवं”, असे सचिन गोस्वामी यांनी म्हटले होते.

आणखी वाचा : “मला हास्यजत्रेत…” ओंकार भोजनेने ‘फू बाई फू’ कार्यक्रमात जाण्याबद्दल दिले स्पष्टीकरण

दरम्यान ओंकार हा सानवी प्रॉडक्शन हाऊस प्रस्तुत आणि आरती चव्हाण यांची निर्मित “सरला एक कोटी’’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकला होता. याची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनेक पुरस्कारप्राप्त चित्रपट ‘आटपाडी नाईट्स’चे नितीन सिंधुविजय सुपेकर यांनी केले आहे. तर विनोद नाईक कार्यकारी निर्माते आहेत. हा चित्रपट गेल्या २० जानेवारी २०२३ ला प्रदर्शित झाला.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Director sachin goswami talk about why onkar bhojne took exit from maharashtrachi hasyajatra nrp