Divya Khosla Kumar : आलिया भट्ट सध्या तिच्या ‘जिगरा’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. ११ ऑक्टोबरला हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाची निर्मिती देखील आलियाने स्वत: केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र होती. ‘सॅकनिल्क’ने दिलेल्या रिपोर्ट्सनुसार गेल्या दोन दिवसांमध्ये ‘जिगरा’ चित्रपटाने ११.५६ कोटींची कमाई केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आलियाच्या चित्रपटाची कमाई पहिल्या दिवशी फारशी समाधानकारक नव्हती. ओपनिंगला ‘जिगरा’ला फक्त ४ कोटी ५५ लाखांचा गल्ला जमावला आला होता. मात्र, यानंतर दुसऱ्या दिवशी ‘जिगरा’ कलेक्शनमध्ये ४३.९६ टक्क्यांची वाढ झाली. आलियाच्या चित्रपटाने शनिवारी ६.५५ कोटी कमावले. या कलेक्शनच्या आकडेवारीवरून प्रसिद्ध निर्माती व अभिनेत्री दिव्या खोसला कुमारने आलियावर आरोप केले आहेत.

हेही वाचा : “मला धक्का बसला…”, बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर रितेश देशमुखने केली न्यायाची मागणी; म्हणाला…

आलिया भट्टवर आरोप

दिव्या ( Divya Khosla Kumar ) आलियाचा चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात गेली होती. यावेळचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर करत थिएटर पूर्णपणे रिकामी असून आलिया ‘फेक’ कलेक्शन सर्वांना सांगतेय असा दावा केला आहे.

दिव्या तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिते, “मी नुकतीच ‘जिगरा’ चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. यावेळी संपूर्ण थिएटर रिकामी होतं. आलिया भट्टमध्ये खरंच खूप जास्त ‘जिगरा’ आहे कारण तिने स्वत:च आपल्या चित्रपटाच्या तिकिटांची खरेदी करून सर्वसामान्य लोकांना Fake बॉक्स ऑफिस कलेक्शन सांगितलं. याप्रकरणी सगळेजण एवढे शांत कसे… हा विचार करून आश्चर्य वाटतं. अशाप्रकारे प्रेक्षकांची फसवणूक करणं चुकीचं आहे. शुभ दसरा!”

दिव्याने ही स्टोरी शेअर केल्यावर आपल्या लाडक्या अभिनेत्रीला करणने पाठिंबा दिला आहे. “मुर्खांना उत्तर देण्यापेक्षा कधी-कधी शांत राहणं योग्य असतं.” अशी पोस्ट शेअर करत दिग्दर्शकाने दिव्या कुमारला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. करणच्या स्टोरीनंतर दिव्याने आणखी एक पोस्ट शेअर केली. यात तिने लिहिलं होतं की, “खरं बोललं की अनेकांना त्रास होतो…”

हेही वाचा : Salman Khan on Baba Siddique: पंतप्रधान मोदी यांच्यासमोर सलमान खाननं घेतलं होतं बाबा सिद्दीकींचं नाव; म्हणाला, “माझं मतदान…”

दिव्या खोसला कुमारची आलिया भट्टसाठी स्टोरी (Divya Khosla Kumar )

दरम्यान, आलियाच्या विरोधात पोस्ट शेअर केल्याने शनिवारी करण आणि दिव्यामध्ये ( Divya Khosla Kumar ) इन्स्टाग्राम पोस्टचं कोल्ड वॉर पाहायला मिळालं. आता ‘जिगरा’ चित्रपट येत्या काही काळात किती कोटींची कमाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Divya khosla kumar accuses alia bhatt of faking jigra box office collections sva 00