‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘ठिपक्यांची रांगोळी’ आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारित असलेल्या या मालिकेचा उद्या म्हणजेच १८ नोव्हेंबरला शनिवारी शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. प्रेमाच्या रंगांनी भरून ही ‘ठिपक्यांची रांगोळी’ पूर्ण होणार आहे. त्यानिमित्ताने मालिकेतील कलाकारांनी चाहत्यांबरोबर काही सुखावणारे तर काही भावुक अनुभव शेअर केले आहेत.
ऑक्टोबर २०२१ रोजी ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली. या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनेते शरद पोंक्षे, उदय टिकेकर, चेतन वडनेरे, मंगेश कदम, अतुल तोडणकर, ज्ञानदा रामतीर्थकर, सुप्रिया पाठारे, लीना भागवत, सारिका निलाटकर-नवाथे, नम्रता प्रधान अशा अनेक तगड्या कलाकार मंडळींनी मालिकेतील आपापली पात्र उत्तमरित्या साकारली. त्यामुळेच शशांक, अप्पू, माई, दादा, विठू, सुवा, कूकी, पन्ना, बाबी आत्या अशी अनेक पात्र प्रेक्षकांना आपल्या घरातली वाटली. शिवाय मालिकेतील ट्विस्टही रटाळवाणे न वाटता चांगलेच खिळवून ठेवणारे होते. त्यामुळे मालिका टीआरपीच्या यादीतही मागे नव्हती. पण आता ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. उद्या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार असून त्याचनिमित्ताने मालिकेतील कलाकारांनी आपले अनुभव सांगितले आहे.
हेही वाचा – ‘सहकुटुंब सहपरिवार’ फेम अभिनेत्रीने घेतली आलिशान गाडी; फोटो शेअर करत म्हणाली…
‘स्टार प्रवाह’च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील कलाकारांचा एका व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी मालिकेने त्यांना काय दिलं? एकंदरीत दोन वर्षांहून अधिक काळाचा प्रवास कसा होता? याविषयी सांगितलं आहे. अप्पू, शशांक, माई, विठू, सुवा, कूकी, पन्ना असे सर्वजण या व्हिडीओत आपापले अनुभव सांगताना दिसत आहेत.
हेही वाचा – ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत आता दिसणार नाही ‘मॅडहेड देवकी’; अभिनेत्री पोस्ट करत म्हणाली, “आज माझा…”
या व्हिडीओवर प्रेक्षकांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘तुम्हा सगळ्यांची खूप आठवण येईल’, ‘प्रत्येक पात्रांची आम्हाला खूप आठवण येईल’, ”ना भूतो ना भविष्यती’ अशी मालिका पुन्हा होणे नाही आणि अशी जोडी पुन्हा होणे नाही’, ‘एक उत्तम मालिका निरोप घेतेय याचं वाईट वाटणे साहजिक आहे. पण ज्ञानदा या मालिकेमुळे अभिनयाची समृध्दी घेऊनच पुढील वाटचाल करेल याची खात्री आहे’ अशा अनेक प्रतिक्रिया ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेच्या प्रेक्षकांनी दिल्या आहेत.
हेही वाचा – Video: हार्दिक जोशीच्या ‘जाऊ बाई गावात’ शोमधील दोन दमदार स्पर्धक जाहीर, कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या…
दरम्यान, ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेचा शेवट सुमीच्या मुलीच्या नामकरणाने होणार आहे. मनस्विनी असं सुमीच्या मुलीचं नाव ठेवलं जाणार आहे अन् मालिकेचा गोड शेवट होणार आहे.