अभिनेत्री डॉली सोहीचं निधन झालं आहे. ४८ वर्षांच्या डॉलीला गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग झाला होता आणि तिच्यावर उपचार सुरू होते. तिची बहीण अमनदीपच्या निधनाच्या दुसऱ्याच दिवशी डॉलीची प्राणज्योत मालवली. तिच्या निधनानंतर तिची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल होत आहे.
“प्रार्थना जगातील सर्वात मोठे वायरलेस कनेक्शन आहे. त्या चमत्काराप्रमाणे काम करतात, मला तुमच्या प्रार्थनांची गरज आहे,” अशी पोस्ट तिने २० फेब्रुवारी रोजी केली होती. ही तिची शेवटची पोस्ट ठरली आहे. तिच्या निधनानंतर या पोस्टवर नेटकरी कमेंट्स करून शोक व्यक्त करत आहेत.
दरम्यान, दोन दिवसात या दोघी बहिणींचं निधन झालं आहे. आधी ७ मार्चला अमनदीपचं कावीळमुळे निधन झालं आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजेच आज (८ मार्च रोजी) डॉलीचं कर्करोगामुळे निधन झालं. तिच्या निधनाची माहिती तिच्या भावाने दिली होती. दोघींच्या निधनामुळे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.