Drama Juniors : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘ड्रामा ज्युनिअर्स’ हा लोकप्रिय कार्यक्रम सध्या चांगलाच सुरू आहे. या कार्यक्रमात अतरंगी मुलांचा बहुरंगी अभिनय पाहायला मिळत आहे. अशातच सध्या ‘ड्रामा ज्युनिअर्स’मधील एक व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे. यामध्ये प्रवीण तरडे ‘ड्रामा ज्युनिअर्स’मधील बालकलाकारांचं कौतुक करताना दिसत आहेत.

‘ड्रामा ज्युनिअर्स’ ( Drama Juniors ) कार्यक्रमात या आठवड्यात ‘धर्मवीर २’ चित्रपटातील कलाकार मंडळी उपस्थित राहणार आहेत. नुकताच ‘झी मराठी’च्या सोशल मीडियाच्या पेजवर ‘ड्रामा ज्युनिअर्स’चा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत, ‘धर्मवीर’ चित्रपटातील गुरुपौर्णिमेचा सीन बालकलाकारांनी रिक्रिएट केलेला पाहायला मिळत आहे. दुर्वने दिवंगत बाळासाहेब ठाकरेंची भूमिका साकारली आहे. तर अर्जुन आनंद दिघेंच्या भूमिकेत दिसत आहे. बालकलाकारांनी केलेला हाच सीन पाहून ‘धर्मवीर’ चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे भारावून गेले. प्रवीण तरडे बालकलाकारांचा परफॉर्मन्स पाहून म्हणाले, “इथे गुरुशिष्याची परंपरा आहे. तुम्ही अक्षरशः डोळ्यात पाणी आणलंत.”

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Aai Kuthe Kay Karte Fame Kaumudi Walokar Sangeet Ceremony
Video : “कौमुदी या अखंड ताऱ्यांच्या…”, फिल्मी स्टाइल प्रपोज, जबरदस्त डान्स अन्…; मराठी अभिनेत्रीचा ‘असा’ पार पडला संगीत सोहळा
Titeeksha Tawde
Video: मालिका संपल्यानंतर कलाकार पुन्हा आले एकत्र; तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ, नेटकरी म्हणाले…
Devar bhabhi Dance in marriage women started dancing on his devar entry trending video
VIDEO: “लो चली मै अपने देवर की बारात लेके” दीराच्या लग्नात वहिनीचीच चर्चा; असा डान्स केला की पाहुणेही झाले थक्क

हेही वाचा – ‘सख्खा भाऊ पक्का वैरी’नंतर मिलिंद गवळींना मिळालेले ४० चित्रपट, जुन्या आठवणी सांगत म्हणाले…

हेही वाचा – Bigg Boss Marathi : “हिल हिल पोरी हिला…”, दादा कोंडकेंच्या गाण्यावर निक्की तांबोळी व अरबाज पटेलचा जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

दरम्यान, ‘ड्रामा ज्युनिअर्स’ ( Drama Juniors ) कार्यक्रमातील अतरंगी लहान मुलांचं परीक्षण अभिनेत्री अमृता खानविलकर व अभिनेता संकर्षण कऱ्हाडे करत आहेत. तसंच सूत्रसंचालनाची जबाबदारी अभिनेत्री जबाबदारी ‘झी मराठी’च्या जुन्या व लोकप्रिय कलाकाराकडे देण्यात आली आहे. ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्रेया बुगडे ‘ड्रामा ज्युनिअर्स’ कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे.

हेही वाचा – ‘नवरा माझा नवसाचा २’मधील पहिलं गाणं कधी येणार? सचिन पिळगांवकरांनी गायकाबरोबरचा फोटो शेअर करत दिली माहिती

धर्मवीर २’ चित्रपट कधी प्रदर्शित होणार?

प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर २’ चित्रपट २७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. याआधी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ९ ऑगस्ट होती. पण काही दिवसांपूर्वी प्रदर्शनाची तारीख बदल्यात आली. या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओकसह क्षितीज दाते, आनंद इंगळे, जयवंत वाडकर, अभिजीत खांडकेकर, हार्दिक जोशी, ऋतुराज फडके असे अनेक कलाकार पाहायला मिळत आहेत.

Story img Loader