ड्राम क्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत नुकतीच उमराहून परतली आहे. अलीकडेच तिचा पती आदिल खानने जेल बाहेर येताच तिच्यावर अनेक गंभीर आरोप केले. त्यानंतर राखीनं सुद्धा आदिलला प्रत्युत्तर दिलं. पण एवढ्यावरचं हे प्रकरण काही थांबलं नाही. अजूनही आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरूच आहे. अशातच राखी उमराह करण्यासाठी गेली होती. ज्यावेळी ती भारतात परतली तेव्हा तिनं पापराझींना राखी नाही तर फातिमा नावानं हाक मारण्यासाठी सांगितलं होतं. तिचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर आता राखीचा अबाया परिधान केलेला नवा व्हिडीओ चर्चेत आला आहे.
हेही वाचा – रजनीकांत ठरले भारतातील सर्वात महागडे अभिनेते; ‘जेलर’साठी घेतलेलं मानधन ऐकून व्हाल थक्क
राखी सावंतचा हा नवा व्हिडीओ ‘फिल्मी ग्नान’ या एंटरटेन्मेंट पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत राखी लाल रंगाच्या अबायामध्ये दिसत आहे. त्यावर तिनं जड असा हार वगैरे घातला आहे. एका कार्यक्रमातील तिचा हा व्हिडीओ आहे. यावेळी पापाराझी आणि फोटो काढण्यासाठी जवळ येणाऱ्यांवर राखी भडकते आणि म्हणते की, “कृपा करून माझ्या जवळ येऊ नका. पुरुषांनी मला स्पर्श करू नका. मी मक्का-मदीनाला जाऊ आली आहे. त्यामुळे पुरुषांनी दूर राहा. मला स्पर्श करू नका. मी पवित्र आहे.”
हेही वाचा – अभिनेत्री तेजश्री प्रधानला आवडतं ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील ‘हे’ पात्र, म्हणाली….
हेही वाचा – बिग बॉस फेम अभिनेत्रीचा भाऊ हॉस्पिटलमध्ये दाखल; फोटो शेअर करत म्हणाली…
राखीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्यानं लिहीलं आहे की, ‘तुला पवित्रचा अर्थ तरी माहित आहे का? स्वतःला उगाच पवित्र म्हणून घेतेय.’ तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहीलं आहे की, ‘पूर्ण टाइमपास आहे. ही मोठी एंटरटेनर आहे.” तसेच तिसऱ्या नेटकरीनं लिहीलं आहे की, ‘नेहमी नौटंकी करणं गरजेच नाही.’
हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबला ‘हा’ क्षण आठवला की डोळ्यात येतं पाणी; म्हणाली, “करिअर संपलं…”
दरम्यान, अलीकडेच राखीला ‘हिंदू धर्मात काय वाईट होतं की तू इस्लाम धर्म स्वीकारलास’, असा प्रश्न तिला विचारण्यात आला. त्यावर राखी म्हणाली होती की, “हिंदू धर्मात कधीच काही चुकीचं, वाईट नव्हतं. मी मुस्लिमाशी लग्न केलं, निकाह केला होता, त्यामुळे जेव्हा तुम्ही निकाह करता तेव्हा तुम्हाला इस्लाम कबूल करावा लागतो. मी मागच्या वर्षभरापासून विवाहित आहे. मी खूप भाग्यवान आहे की मला मक्का-मदीना जायला मिळालं.”