Drashti Dhami : मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आई झाली आहे. साधारण २०१२ मध्ये कलर्स टीव्हीवर ‘मधुबाला’ ही मालिका सुरू झाली होती. या मालिकेने बघता-बघता टीआरपीचे सर्व रेकॉर्ड्स मोडले होते. यामध्ये मुधबालाचं पात्र साकारणारी अभिनेत्री दृष्टी धामी घराघरांत लोकप्रिय झाली. वैयक्तिक आयुष्यात ही लोकप्रिय अभिनेत्री २०१५ मध्ये नीरज खेमका यांच्याबरोबर विवाहबंधनात अडकली. आता लग्नानंतर ९ वर्षांनी अभिनेत्रीने बाळाला जन्म दिला आहे.

दृष्टी धामीने ( Drashti Dhami ) नुकताच इन्स्टाग्रामवर ४१ आठवडे उलटून गेले, १० महिना सुरू झालाय…तरीही प्रसुती झाली नसल्याचा एक व्हिडीओ शेअर केला होता. बाळाची आतुरतेने वाट पाहत असतानाच अभिनेत्रीच्या घरी लक्ष्मीचं आगमन झालं आहे. दृष्टी धामीने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. याबद्दल तिने स्वत: इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

Deepika Padukone Ranveer Singh Reveals Baby Girl Name
दीपिका पादुकोण-रणवीर सिंह यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर ठेवलं लाडक्या लेकीचं नाव; फोटो शेअर करत सांगितला अर्थ
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
madhuri dixit mumbai home inside photos
माधुरी दीक्षितचं मुंबईतील घर आतून कसं दिसतं? पाहा ५३ व्या मजल्यावरील अपार्टमेंटचा Inside Video
Marathi actor abhijeet kelkar reaction on trolling about suraj Chavan his post
“मी ब्राम्हण जातीतला असलो तरी…”, सूरज चव्हाणबद्दल केलेल्या पोस्टवरील ट्रोलिंगवर अभिजीत केळकरचं भाष्य, म्हणाला, “मला शिव्या देऊन..
tharla tar mag fame monika dabade announce pregnancy
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री लग्नाच्या ९ वर्षांनंतर होणार आई! फोटो शेअर करत दिली गुडन्यूज; होतोय शुभेच्छांचा वर्षाव
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल

हेही वाचा : Salman Khan bodyguard : सलमान खानचा ३० वर्षे बॉडीगार्ड असलेल्या ‘शेरा’ची गोष्ट! त्याचं खरं नाव, वय माहितीये का? जाणून घ्या…

दृष्टी धामीच्या घरी चिमुकलीचं आगमन

दृष्टी ( Drashti Dhami ) आई झाल्याची आनंदाची बातमी शेअर करताना लिहिते, “२२ ऑक्टोबर २०२४… आमच्या घरी ती आलीये…थेट स्वर्गातून आमच्या हृदयावर राज्य करण्यासाठी, आम्हाला एक नवीन आयुष्य देण्यासाठी…ती आलीये! ही एक नवीन सुरुवात आहे” यावरून दृष्टीला कन्यारत्न प्राप्ती झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

दृष्टी गरोदरपणात सुद्धा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय होती. यादरम्यान तिने अनेकदा वर्कआऊट करतानाचे, आरोग्याची काळजी घेतानाचे व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. तसेच जे काही करतेय ते सगळं मी डॉक्टरांच्या सल्ल्याने करतेय असं नेहमी दृष्टी तिच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये नमूद करायची.

हेही वाचा : Video : जडतो तो जीव…; पुरस्कार सोहळ्यात प्रिया बापटने गायलं २५ वर्षे जुन्या मालिकेचं अजरामर गीत, सर्वत्र होतंय कौतुक

हेही वाचा : “वस्तू मिळतात अन्…”, अक्षयाने साड्यांच्या दुकानात लावली हटके ‘पुणेरी पाटी’! पाठकबाईंनी शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोने वेधलं लक्ष

दरम्यान, वयाच्या ३९ व्या वर्षी दृष्टीने ( Drashti Dhami ) गोंडस अशा मुलीला जन्म दिला आहे. अभिनेत्रीच्या पोस्टवर नेटकऱ्यांसह मनोरंजनविश्वातील कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. जेनिफर विंगेट, रुबिना दिलैक, नकुल मेहता, दिशा परमार, सुरभी ज्योती, किश्वर मर्चंट या सगळ्यांनी दृष्टीवर कौतुकाचा वर्षाव करत तिला या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Story img Loader