‘पारू’ (Paaru) मालिका सतत रंजक वळण घेताना दिसते. किर्लोस्करांच्या आयुष्यात सतत काही ना काही घडताना पाहायला मिळते. कधी आदित्यवर संकट येते, तर कधी अहिल्यादेवीवर संकट येते. या सगळ्यांना त्यांच्या घरात काम करणारी पारू सुखरूपपणे बाहेर काढताना दिसते. दिशाचे सत्य समोर आणण्यापासून ते इतर अनेक गोष्टींमध्ये पारू त्यांच्या मदतीला धावून जाताना दिसते. या सगळ्याबरोबरच पारूचा किर्लोस्कर कुटुंब व आदित्यबरोबर चांगला बॉण्डदेखील असल्याचे पाहायला मिळते. आता मालिकेत नवीन ट्विस्ट येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

दारूच्या नशेत काय करणार पारू?

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘पारू’ मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. प्रोमोच्या सुरुवातीला पारू, आदित्य व अनुष्का हे एकत्र बसलेले दिसत आहेत. आदित्य तुझा मित्र आहे ना? मीदेखील मैत्रीण होऊ शकते, असे अनुष्का पारूला म्हणताना ऐकायला मिळत आहे. त्यानंतर तिला फसवून दारू पाजली जाते. प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, पारूने दारू प्यायली असून, त्या नशेत ती अनुष्काबरोबर बोलत आहे. त्यावेळी तिथे आदित्य उपस्थित नाही. पारू अनुष्काला म्हणते, “माझ्या पोटात एक सीक्रेट आहे. माझं आदित्य सरांबरोबर लग्न झाले आहे. त्यानंतर पारू अनुष्काला तिचे मंगळसूत्रदेखील दाखवत असल्याचे दिसत आहे. पारूचे हे बोलणे ऐकल्यानंतर अनुष्काला धक्का बसला असल्याचे तिच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे.

gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Rapper Raftaar is all set to tie the knot with fashion stylist Manraj Jawanda
रफ्तार दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार! घटस्फोटाच्या ५ वर्षांनी रॅपर चढणार बोहल्यावर, होणारी बायको कोण आहे? वाचा…
Fake police entered rikshaw tried Scamming a Girl over Vape for 50 k girl recorded it went viral on social media
‘तो’ अचानक रिक्षात शिरला अन्…, तिच्या एका निर्णयामुळे टळली दुर्घटना! तरुणीबरोबर नेमकं काय घडलं? धक्कादायक VIDEO एकदा पाहाच
Aai Aani Baba Retire Hot Aahet
Video : भर लग्नमंडपातून स्वीटीचा भाऊ तिला घेऊन जाणार? पाहा ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ मालिकेचा नवा प्रोमो
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”
Lakhat Ek Amcha Dada fame komal more atul kudale Kalyani choudhary dance on dada kondke song
Video: ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील कलाकारांचा दादा कोंडकेंच्या ‘या’ लोकप्रिय गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
Pimpri , fire, worker house, cash burnt, loksatta news,
पिंपरी : कामगाराच्या घराला भीषण आग, पाच लाखांची रोकड जळून खाक

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, पारू ही किर्लोस्कर यांच्या घरात काम करणारी मुलगी आहे. त्याबरोबरच ती किर्लोस्करांच्या एका प्रॉडक्टची ब्रॅण्ड अ‍ॅम्बासिडर आहे. या प्रॉडक्टच्या एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान आदित्यने पारूच्या गळ्यात मंगळसूत्र घातले होते. मात्र, पारूने तिचे आदित्यबरोबर लग्न झाले असल्याचे खरे मानले. त्यानुसार ती स्वत:ला किर्लोस्करांची मोठी सून मानते. गळ्यात मंगळसूत्र घालते. त्याबद्दल तिला व सावित्रीआत्या या दोघींनाच माहीत आहे. आता अनुष्का आदित्यच्या आयुष्यात आली असून, पुढे काय होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

हेही वाचा: Pushpa 2 : ११ व्या दिवशी कमावले तब्बल ‘इतके’ कोटी! ‘पुष्पा’ने मोडला KGF चा रेकॉर्ड, एकूण कलेक्शन किती?

दरम्यान, आता पारूचे हे सत्य समजल्यानंतर अनुष्का पुढे काय करणार, किर्लोस्करांचा बदला अनुष्का कशी घेणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Story img Loader