करोनानंतर अनेक कलाकार हे काम मिळवण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. त्यासाठी काहींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत काम नसल्याचे सांगितले. तर काहींनी काहीतरी काम मिळावं, यासाठी पोस्ट केल्या आहेत. त्यातच आता एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने मला कोणीतरी काम द्या अशा आशयाची पोस्ट केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेत कुहू आणि प्रभात यांची जोडी प्रचंड गाजली होती. या मालिकेत प्रभात हे पात्र अभिनेता श्रीकार पीत्रेने साकारले होते. याच मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता श्रीकार पित्रे एका पोस्टमुळे चर्चेत आला आहे.
आणखी वाचा : “बिकिनीवरती जरतारीचा मोर…” चाहत्याच्या ‘त्या’ कमेंटवर मिताली मयेकरच्या उत्तराने वेधलं लक्ष

श्रीकार पित्रेने नुकतंच फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. “नमस्कार खूप दिवस झाले इथे पोस्ट टाकावी का नको ह्या संभ्रमात होतो. पण म्हणलं एक प्रामाणिक प्रयत्न करून बघुया. कामं शोधण्याचे अनेक प्रयत्न झाले.. मला अभिनय करायचा आहे आणि मी चांगल्या कामाच्या शोधात आहे. कोणाकडे माझ्यासाठी काही चांगला रोल असल्यास कृपया मला संपर्क साधावा. धन्यवाद”, असे श्रीकारने म्हटले आहे.

आणखी वाचा : “पार्थ भालेरावचा व्हिसा आला नाही अन्…”, मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली “आम्ही १५ दिवस…”

दरम्यान श्रीकारने मालिका, चित्रपट आणि नाटक या तिन्ही माध्यमात काम केले आहे. तो काही बालनाट्यांमध्येही झळकला. ‘जंबा बंबा बू’ हे त्यांचं बालनाट्यही गाजलं. श्रीकारने ‘ती फुलराणी’, ‘लव लग्न लोचा’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या अशा अनेक मराठी मालिकांमध्येही काम केले आहे. त्याबरोबरच ‘चुभन’, ‘इश्क वाला लव्ह’ या चित्रपटातही तो झळकला. सध्या श्रीकारची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eka lagnachi dusri goshta fame marathi actor shrikar pitre share facebook post for job hunt nrp