छोट्या पडद्यावरील सलमान खानचा शो म्हणून ओळख असलेल्या ‘बिग बॉस’चं १७वं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अवघे काही दिवसच बाकी आहेत. १५ ऑक्टोबरपासून ‘बिग बॉस’चं १७वं पर्व सुरू होणार आहे. पण त्यापूर्वीपासून या पर्वात कोणते स्पर्धक झळकणार याची जोरदार चर्चा रंगली आहे. काही निश्चित झालेल्या स्पर्धकांची नाव देखील समोर आली आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विक्की जैन, तसेच लोकप्रिय युट्यूबर अरमान मलिका आणि पत्नी पायल मलिक हे कपल म्हणून बिग बॉसमध्ये जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. अशातच बिग बॉसच्या या आगामी पर्वात सिस्टम हँग करायला एल्विश यादव नाही तर त्याच्या जवळच्या व्यक्तीची एन्ट्री होणार असल्याचं समोर आलं आहे.
यंदा ‘बिग बॉस १७’ची थीम सिंगल विरुद्ध कपल आहे. अंकिता लोखंडे, विक्की जैन, अरमान मलिका, पायल मलिक, ऐश्वर्या शर्मा, नील भट्ट, कंवर ढिल्लो आणि ऐलिस कौशिक हे कपल म्हणून खेळणार असल्याचं म्हटलं जात आहे. तर इशा सिंह, इशा मालवीय, जय सोनी, समर्थ जुरेल, फहमान खान आणि लोकप्रिय युट्यूबर हर्ष बेनिवाल हे सिंगल म्हणून खेळणार असल्याची शक्यता आहे. यामध्ये आता बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता एल्विश यादव याची एक्स गर्लफ्रेंड असणार असल्याची हिंट मिळाली आहे.
हेही वाचा – Video: ‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्माने सादर केली नवी मराठी कविता; चाहते म्हणाले, “लय मस्त..”
कीर्ति मेहरा असं एल्विशच्या एक्स गर्लफ्रेंडचं नाव आहे. तिने तिच्या व्लॉगमधून ती बिग बॉसच्या आगामी पर्वात एन्ट्री करणार असल्याची हिंट दिली आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. पण ती ‘बिग बॉस १७’मध्ये खरंच एन्ट्री करणार की नाही? हे येत्या काळात स्पष्ट होईल.
हेही वाचा – ‘अॅनिमल’ चित्रपटातील पहिल्या गाण्याचं पोस्टर प्रदर्शित; रणबीर कपूर-रश्मिका मंदाना झळकले लिपलॉक करताना
दरम्यान, इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, सनी लिओनी आणि पामेला एंडरसन यांच्यानंतर ‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वात अडल्ट कंटेंट क्रिएटर शिल्पा सेठीची एन्ट्री होणार आहे. ‘किम कार्दशियन ऑफ इंडिया’ म्हणून तिला ओळखलं जात. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट या खूप चर्चेत असतात. शिल्पा व्यतिरिक्त अभिनेत्री मनस्वी ममगई बिग बॉस शोमध्ये सहभागी होणार आहे.