बहुप्रतिक्षीत रिअॅलिटी शो बिग बॉस १७ चे ग्रँड प्रिमिअर रविवारी (१५ ऑक्टोबर ) पार पडले. कार्यक्रमाची दणक्यात सुरुवात झाली असून या पर्वात १७ स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये दोन अंकिता लोखंडे व विकी जैन, तसेच ऐश्वर्या शर्मा व नील भट्ट या जोडप्याची एंट्री झाली आहे. तसेच एक ब्रेकअप झालेलं जोडपंदेखील आलं आहे. सलमान खानसमोरच या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘बिग बॉस १७’ ची दणक्यात सुरुवात, सलमान खानच्या शोमध्ये अंकिता लोखंडे-विकी जैनसह ‘हे’ १७ स्पर्धक सहभागी

‘उडारियां’ मालिकेतून घराघरात पोहोचलेले अभिषेक कुमार व ईशा मालवीय यांची बिग बॉसमध्ये एंट्री झाली आहे. दोघेही काही काळ रिलेशनशीपमध्ये होते आणि नंतर त्यांचं ब्रेकअप झालं. आता दोघेही बिग बॉसमध्ये पोहोचले आहेत. दोघांचं मंचावर सलमानने स्वागत केलं आणि तिथेच ईशा व अभिषेकचं भांडण झालं. दोघांनी एकमेकांवर अनेक गंभीर आरोपही केले.

आयरा खानच्या सासूबाईंना पाहिलंत का? आमिर खानने केलं मराठमोळ्या विहीणबाईंचं कौतुक; म्हणाला, “प्रीतमजी…”

‘बिग बॉस १७’ च्या प्रीमियरमध्ये अभिषेक कुमार आणि ईशा मालवीय यांचा शो सुरू होण्याआधी शूट केलेला व्हिडीओ दाखवण्यात आला होता. यामध्ये दोघांनी एकमेकांसोबत घालवलेले क्षण आणि बिघडलेल्या नात्याबद्दल भाष्य केलं. टीव्ही शोच्या सेटवर जवळीक वाढली आणि ते एकमेकांना डेट करू लागले. रिलेशनशिपबद्दल बोलताना प्रीमियरमध्ये दोघांमध्ये वाद सुरू होतो आणि दोघांमधील वाद इतका वाढतो की ते एकमेकांवर गंभीर आरोप करू लागतात.

ईशाने अभिषेकवर केले आरोप

ईशाने अभिषेकवर हिंसाचाराचा आरोप केला. जेव्हा ती त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती, तेव्हा त्याने तिला मारहाण केली होती. यानंतर सलमान तिला समजावतानाही दिसतो की ती नॅशनल टेलिव्हिजनवर एका अभिनेत्यावर गंभीर आरोप करत आहे, त्यानंतर तिचं करिअर संपू शकतं, पण ईशा वारंवार हिंसाचारावर बोलत राहते.

अभिषेकने ईशावर केले गंभीर आरोप

अभिषेकनेही ईशावर अनेक गंभीर आरोप केले. त्याच्या म्हणण्यानुसार, ईशाने आधी हिंसाचार सुरू केला होता. तिने आपल्या ओठांवर नखाने जखमा केल्याचा आरोप अभिषेकने केला. दोघांचे बोलणे ऐकून सलमान खान खूप अस्वस्थ होतो आणि त्यांचा वाद पाहून पाठमोरा वळतो, त्यानंतर ते दोघे शांत होतात. प्रिमिअरमध्येच अभिषेक ईशाचं कडाक्याचं भांडण झालं, आता घरात दोघे एकमेकांबद्दल काय बोलतात, ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.