मालिकेच्या सेटवर गळफास लावून आत्महत्या करणाऱ्या तुनिषा शर्मावर आज तब्बल ३ दिवसांनी अंतिम संस्कार करण्यात आले. पोस्टमॉर्टेममुळे बऱ्याच गोष्टींचा खुलासा व्हायचा बाकी असल्याने अंत्यविधीसाठी तुनिषाच्या घरच्यांना ३ दिवस वाट पाहावी लागली. अभिनेत्रीच्या आईने तक्रार दाखल केल्यानंतर शिझानला अटक करण्यात आली आणि सध्या तो पोलीस कोठडीत आहे. शिझानला २८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.शिझानने ब्रेक अप केल्यामुळे नैराश्यातून तुनिषाने आत्महत्या केल्याचं म्हटलं जातंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुनिषाच्या अंतिम दर्शनासाठी बऱ्याच लोकांनी गर्दी केली होती. तुनिषाचे कुटुंबीय तसेच मित्रपरिवार सगळे तिला निरोप देण्यासाठी एकत्र जमले होते. कुणीही त्या धक्क्यातून सावरलेलं नसल्याचं स्पष्टपणे दिसत होतं. तुनिषाचा एक्स बॉयफ्रेंड शिझान खानच्या दोघी बहिणी शफक आणि फलक नाज यांनीसुद्धा त्यांच्या आईसह तुनिषाला निरोप देण्यासाठी हजेरी लावली.

आणखी वाचा : अवघ्या ८ दिवसांनी आहे तुनिषा शर्माचा वाढदिवस; गेल्या वर्षीच्या जंगी सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल

यादरम्यान या दोघी बहिणींना अश्रू अनावर झाले. अंत्यविधी दरम्यान दोघीही खूप भावूक होत्या हे व्हिडिओमधून स्पष्ट दिसत होतं. यापैकी फलक ही तुनिषाच्या बरीच जवळची होती त्यामुळे अंत्यविधीदरम्यान तिला अचानकच रडू कोसळलं. तिच्याबरोबरच त्यांच्या आईलाही रडू अनावर झालं, नंतर शफक ही ह्या दोघींना सावरत बाजूला घेऊन जाताना दिसली.

नुकतंच फलक नाज आणि शफक नाज यांनी आपल्या भावाच्या अटकेबद्दल आणि त्यामुळे होणाऱ्या मनस्तापाबद्दल वक्तव्य केलं आहे. त्या म्हणाल्या, “मीडिया क्षेत्रातील मंडळी सतत आम्हाला फोन करत आहेत, आमच्या घराखाली येऊन थांबले आहेत हे सगळं खूप अस्वस्थ करणारं आहे. भारतीय न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि शिझानही पोलिसांना योग्य ते सहकार्य करत आहे. योग्य वेळ येताच आम्ही यावर भाष्य करू.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Falaq and shafaq naaz sisters of sheezan khan gets emotional during last rites of tunisha sharma avn