‘दिल मिल गये’ आणि ‘कभी सौतन कभी सहेली’ यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम करून टीव्ही अभिनेता पंकित ठक्करला लोकप्रियता मिळाली. सध्या पंकित ठक्कर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पंकितचा घटस्फोट झाला आहे. पंकित व त्याची पत्नी प्राची लग्नानंतर २४ वर्षांनी कायदेशीररित्या विभक्त झाले आहे. दोघेही मागील नऊ वर्षांपासून वेगळे राहत होते.

पंकित आणि प्राची यांनी २०१६ मध्ये विभक्त होत असल्याची घोषणा केली होती. मात्र, कायदेशीररित्या त्यांचा घटस्फोट झाला नव्हता. आता टाइम्स ऑफ इंडियाने त्यांचा घटस्फोट झाल्याचे वृत्त दिले आहे. पण या दोघांनी अद्याप घटस्फोटाची घोषणा केली नाही. घटस्फोटाबाबत विचारण्यासाठी त्यांनी पंकितशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा “मला माझ्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य करायला आवडणार नाही,” असं तो म्हणाला.

Tula Shikvin Changalach Dhada Fame Virisha Naik Wedding
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! नवरा ‘या’ लोकप्रिय मालिकेत करतोय काम, फोटो आले समोर
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
actress Ayushi Khurana married to Suraj Kakkar
पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपं अडकलं लग्नबंधनात, फोटो आले समोर
marathi actress hemal ingle kelvan photos
थायलंडला बॅचलर पार्टी, कोल्हापुरात केळवण! मराठमोळ्या अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई; फोटो आले समोर
manasi moghe marathi actress announces pregnancy
मराठमोळी अभिनेत्री लवकरच होणार आई! नवरा आहे लोकप्रिय हिंदी अभिनेता, २०१३ मध्ये झालेली मिस Diva युनिव्हर्स

हेही वाचा – नाना पाटेकर यांच्या पत्नीला पाहिलंत का? फक्त ७५० रुपयांत केलेलं लग्न; ‘अशी’ झालेली दोघांची पहिली भेट

पंकित आणि प्राची यांचे लग्न ११ सप्टेंबर २००० रोजी झाले होते. पंकित तेव्हा फक्त २१ वर्षांचा होता. तर प्राची त्याच्यापेक्षा आठ वर्षांनी मोठी होती. त्यामुळे या लग्नाला पंकितच्या कुटुंबाचा विरोध होता. दोघांच्या वयातील अंतर व पंकितचं कमी वयात लग्न यामुळे पंकित व प्राचीच्या लग्नात अनेक अडचणी आल्या. या दोघांनी समुपदेशनाद्वारे आपलं नातं सुधारण्यासाठी खूप प्रयत्न केले, मात्र त्यांना यश आलं नाही.

हेही वाचा – खूपच सुंदर आहे तितीक्षा तावडेचं सासरचं नवीन घर! दारावरची नेमप्लेट पाहिलीत का? सर्वत्र होतंय कौतुक, पाहा फोटो

पंकितला नातं वाचवण्यासाठी बिग बॉसमध्ये जायचं होतं

“सलमान खानच्या बिग बॉस या शोमध्ये रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्ला यांनी त्यांचं नातं वाचवलं. ते पाहिल्यानंतर मला माझ्या लग्नाला अंतिम संधी देण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्राचीची शो करायला हरकत नसेल, असं मला वाटतं. आम्ही बऱ्याच समुपदेशकांकडे गेलो पण ते आम्हाला मदत करू शकले नाही. आमचे लग्न वाचवण्यासाठी आम्ही जवळजवळ सर्व प्रयत्न केले. पण वेगळे राहिल्यानंतर आम्ही जास्त आनंदी आहोत,” असं स्पॉटबॉयला दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना पंकित म्हणाला होता.

Video: अखेर ‘बिग बॉस मराठी ४’ विजेता अक्षय केळकरची गर्लफ्रेंड ‘रमा’ आली समोर, अभिनेत्याने व्हिडीओ केला शेअर

पंकित व प्राची यांना एक मुलगा आहे. तो प्राचीजवळ राहतो आणि पंकितचा त्याला विरोध नाही. पंकित ठक्करच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तो ‘बरसातें: मौसम प्यार का’ मालिकेत दिसला होता. तो ‘एक प्यारा सा बंधन’, ‘बहू हमारी रजनीकांत’ या मालिकांचा भाग राहिला आहे. तर प्राची ठक्करने ‘कसौटी जिंदगी की’, ‘सेठजी’ आणि ‘हवन’ या मालिकांमध्ये काम केलं आहे.

Story img Loader