‘बडे अच्छे लगते है’ फेम राम कपूरने राखी सावंतचं कौतुक केलं आहे. राखी सावंतने हिंदी चित्रपटसृष्टीत कोणताही गॉडफादर नसताना नाव कमावले, त्याबद्दल रामने भाष्य केलं. राखीचं कौतुक करताना रामने तिच्या संघर्षाकडे लक्ष वेधलं. त्यावेळी त्याने राखीच्या स्वयंवरचा उल्लेखही केला. राखीचा इंडस्ट्रीने गैरवापर करण्याचा प्रयत्न केला, असंही रामने म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२००९ मध्ये ‘राखी का स्वयंवर’ आयोजित करण्यात आला होता. या स्वयंवरचा विजेता कॅनडा येथील एलेश पारुजनवाला होता. हा शो २९ जून २००९ ते २ ऑगस्ट २००९ या कालावधीत प्रसारित करण्यात आला होता. राखी आणि एलेश यांनी फिनालेमध्ये एंगेजमेंट केली होती, त्यानंतर काही महिन्यांनी ते वेगळे झाले होते. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या एका मुलाखतीत रामने सांगितलं की तो राखीच्या मतांशी सहमत नसला तरीही तिने स्वबळावर नाव कमावलंय, त्यासाठी तो तिचा आदर करतो.

हेही वाचा – “मी खचलो होतो”, प्रसिद्ध अभिनेत्याने केली घटस्फोटाची घोषणा; अतुल सुभाषशी स्वतःची तुलना करत म्हणाला, “माझ्या आयुष्यातील…”

राम कपूर नेमकं काय म्हणाला?

राम कपूर म्हणाला, “आज संपूर्ण देशाला राखी सावंतचे नाव माहीत आहे. ती मुंबईत 3 बीएचके सी फेसिंग अपार्टमेंटमध्ये राहते, मी तिच्याकडे गेलो आहे. मी तिचा आदर करतो! तिने हे स्वतःच साध्य केलं आहे. मी कदाचित तिची फिलॉसॉफी, तिचा वेडेपणा याच्याशी सहमत नसेन. ती खूप फालतू गोष्टी बोलते, पण ती जे आहे, ती जे करतेय ते तिने स्वबळावर मिळवलं आहे. तिने स्वतःचं आयुष्य स्वतः बनवलं आहे आणि मी ते पाहिलं आहे. एक सुंदर, सेक्सी डान्सर, जिचा इंडस्ट्रीने गैरवापर करण्याचा प्रयत्न केला, जिला खूप वाईट अनुभव आले, तिने कोणीच गॉडफादर नसताना तिने हे सर्व कमावलंय. मी या सगळ्या गोष्टी ‘राखी का स्वयंवर’मध्ये पाहिल्या.”

हेही वाचा – “मी त्याला झापड मारली असती”, सून ऐश्वर्या रायमुळे शाहरुख खानवर भडकलेल्या जया बच्चन

राम कपूर सध्या वजन घटवल्यामुळे चर्चेत आहे. त्याचे वजन १४० किलो होते, त्याने ते ८५ किलोपर्यंत कमी केले आहे. त्याने तब्बल ५५ किलो वजन कमी केले आहे. हा अचानक झालेला बदल नव्हता, तर पाच वर्षांचा प्रवास होता; असं रामने सांगितलं. “पाच वर्षे मी वजन कमी करत होतो. आधी मी ३० किलो वजन कमी केले आणि नंतर ते परत वाढलं, त्यानंतर वर्षभरात पुन्हा कमी केलं”, असं राम कपूर म्हणाला.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Famous actor ram kapoor praised rakhi sawant says she owns 3 bhk sea facing apartment in mumbai hrc