Chahatt Khanna New Home : टीव्ही अभिनेत्री चाहत खन्नाने दिवाळीनिमित्त एक आनंदाची बातमी दिली आहे. चाहतने नवीन घर घेतलं आहे. तिने नवीन घरात दिवाळी साजरी केली. दिवाळी सेलिब्रेशनचे काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आणि नवीन घर घेतल्याचं सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टीव्ही अभिनेत्री चाहत खन्नाचा दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला आहे. चाहतने या दिवाळीत नवीन घर घेतलं आहे. तिने ही दिवाळी तिच्या नवीन घरात कुटुंबीय आणि मित्रांबरोबर साजरी केली. चाहतने सेलिब्रेशनचे फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. नवीन घरात दिवाळी पूजेनंतरचे फोटो पोस्ट करताना चाहतने तिच्या चाहत्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.

हेही वाचा – बाबा अन् भावाला गमावलं, प्रचंड संघर्षानंतर अभिनेत्रीने २८ व्या वर्षी मुंबईत घेतलं हक्काचं घर, आईसह पूजा करताना झाली भावुक

पहिला घटस्फोट झाल्यावर चाहत खन्ना एका मुस्लीम तरुणाच्या प्रेमात पडली. प्रेमानंतर चाहतने दुसरे लग्न केले आणि हिंदू धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारला. पण दुसऱ्या लग्नात तिला खूप अडचणी आल्या आणि ती पतीपासून विभक्त झाली. दुसऱ्या पतीला घटस्फोट दिल्यावर तिने इस्लाम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला. आता चाहतने मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली आहे.

हेही वाचा – सूरज चव्हाणचे ट्रेडिंग गाण्यावर रील पाहून युजर म्हणाला, “भाऊ, तू असे व्हिडीओ नको बनवत जाऊस…”

चाहत टीव्ही जगतातील मोठी स्टार आहे आणि २० वर्षांहून अधिक काळापासून काम करत आहे. तिने वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी ‘सच्ची बात सभी जग जाने’ या मालिकेतून आपल्या करिअरची सुरुवात केली. यानंतर तिने अनेक हिट मालिकांमध्ये काम केले. चाहतला प्रसिद्ध टीव्ही मालिका ‘बडे अच्छे लगते हैं’ मधून खूप लोकप्रियता मिळाली. चाहत तिच्या कामाबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिली.

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापची पत्नी काय काम करते? प्राजक्ताचे शिक्षण किती? म्हणाली, “मी ९ वर्षांपासून…”

वर्षभरात मोडलं पहिलं लग्न

चाहतने दोनदा लग्न केले आणि दोन्ही वेळा तिचे घटस्फोट झाले. चाहतने २००६ मध्ये भरत नरसिंघानीशी लग्न केलं होतं. त्यावेळी ती फक्त २० वर्षांची होती. मात्र, त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. वर्षभराने २००७ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. चाहतने भरतवर शारीरिक व मानसिक शोषणाचे आरोप केले होते. पहिलं लग्न मोडल्यावर सहा वर्षांनी चाहतने दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा – Singham Again vs Bhool Bhulaiyaa 3 : ‘सिंघम अगेन’ने बॉक्स ऑफिसवर मारली बाजी, पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

दुसऱ्या पतीवर गंभीर आरोप

पहिल्या लग्नात अपयश आल्यानंतर चाहतने २०१३ मध्ये फरहान मिर्झाशी इस्लाम धर्म स्वीकारून लग्न केलं. पाच वर्षांच्या संसारानंतर दुसऱ्यांदा तिचा घटस्फोट झाला. चाहतला फरहानपासून दोन जुळ्या मुली आहेत. आता ती एकटीच मुलींचा सांभाळ करत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Famous actress chahatt khanna bought new home on the occasion of diwali 2024 hrc