Smriti Khanna blessed with Baby Girl :‘मेरी आशिकी तुमसे ही’ फेम लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री स्मृती खन्ना दुसऱ्यांदा आई झाली आहे. तिने गुरुवारी ५ सप्टेंबर रोजी बाळाला जन्म दिला. सोशल मीडियावर बाळाचा फोटो पोस्ट करत स्मृतीने ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. स्मृती व गौतम गुप्ता दुसऱ्यांदा आईबाबा झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्मृतीने मुलीला जन्म दिला आहे. तिची मोठी लेक अनायरा लहान बहिणीला घेऊन बसलेली फोटोमध्ये पाहायला मिळते. यात तिच्या गोंडस लहान लेकीची झलकही दिसत आहे. तिने मोठी मुलगी अनायकाचा लहान बहिणीबरोबरचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. लहान बहीण असावी अशी अनायकाची इच्छा पूर्ण झाली आहे आणि आमचे कुटुंब आता पूर्ण झाले आहे.
०५.०९.२०२४
असं कॅप्शन स्मृतीने तिच्या दोन्ही लेकींचे फोटो पोस्ट करत दिलंय.

बॉलीवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, तीन वर्षांपूर्वी बिझनेसमनशी केलंय लग्न

स्मृतीने एप्रिल महिन्यात ती दुसऱ्यांदा गरोदर असल्याची गुड न्यूज हिली होती. तिने मुलगी अनायका व पती गौतम गुप्ताबरोबरचे फोटो शेअर केले होते. “आमचे कुटुंब आता वाढणार आहे. आमची मुलगी अनायका आता मोठी बहीण होणार आहे. या दिवसाची आम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होतो. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही खूप काही सहन केलं आहे. ही आनंदाची बातमी सांगताना आम्हाला खूप आनंद होत आहे,” असं तिने बेबी बंपचे फोटो शेअर करत लिहिलं होतं. आता स्मृती दुसऱ्यांदा आई झाली आहे.

दारूची नशा, सिगारेटचे चटके अन्…; नर्गिसने सुनील दत्त यांच्याशी लग्न केल्यावर राज कपूर यांची ‘अशी’ झाली होती अवस्था

स्मृती खन्ना व गौरव गुप्ता आणि त्यांची लेक अनायका (फोटो – इन्स्टाग्राम)

मालिकेच्या सेटवर पहिली भेट अन् लग्न

‘मेरी आशिकी तुमसे ही’ या मालिकेच्या सेटवर स्मृती व गौतम गुप्ता यांची भेट झाली होती. त्यांनी २०१७ मध्ये लग्न केलं आणि २०२० मध्ये लेक अनायकाचं स्वागत केलं होतं. आता चार वर्षांनी त्यांच्या घरात आणखी एका सदस्याचं आगमन झालं आणि त्यांचं कुटुंब पूर्ण झालं आहे.

‘साथ निभाना साथिया’ फेम मराठमोळ्या रुचाचा पती काय काम करतो? तिची लेक कशी दिसते? जाणून घ्या

स्मृती खन्ना ही ‘ये है आशिकी’, ‘बालिका वधू’ सारख्या अनेक टीव्ही मालिकांमध्ये दिसली आहे. याशिवाय तिने काही चित्रपटांमध्येही काम केलं आहे. स्मृती पंजाबी चित्रपट ‘जट ऑलवेज’मध्ये झळकली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Famous actress smriti khanna blessed with second daughter gautam gupta hrc