स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेतील सर्वच कलाकार कायमच चर्चेत असतात. नुकतंच या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता अभिषेक गावकर हा एका वेगळ्याच कारणांनी चर्चेत आला आहे. अभिषेक गावकर हा सध्या सोशल मीडिया रिलस्टार असणाऱ्या सोनाली गुरवला डेट करत आहे.

सोनाली गुरवने नुकतंच इन्स्टाग्रामवर काही पोस्ट शेअर केल्या आहेत. यात सोनाली आणि अभिषेक हे फिरण्यासाठी गेल्याचे पाहायला मिळत आहेत. नुकतंच सोनालीने तिच्या इन्स्टाग्रामवर दोघांचा एक छान फोटो पोस्ट केला आहे. त्यात ते दोघेही एकत्र बसल्याचे पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : “ही वेळ आपल्या घरच्या मुलीवरही येऊ शकते”, प्रसिद्ध इन्स्टा स्टारची व्हायरल अश्लील व्हिडीओप्रकरणी पोलिसांत धाव, म्हणाली “लोकांना मजा मारायला…”

Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Bigg Boss Marathi Season 5 Fame Jahnavi Killekar make reel video with son Ishan
Video: “सारी उमर चल दूँगी साथ तेरे…”, ‘बिग बॉस मराठी’नंतर जान्हवी किल्लेकरने पहिल्यांदाच लेकाबरोबर केला Reel व्हिडीओ, पाहा
tharla tar mag arjun confess love for sayali at bus stand
ठरलं तर मग : अखेर तो क्षण आला! एसटी स्टँडवर जाहीर घोषणा करत अर्जुनने दिली प्रेमाची कबुली; म्हणाला, “मिसेस सायली…”
Sridevi
श्रीदेवीला पाहताच विनोद खन्ना, ऋषी कपूर व इतर दिग्गज अभिनेत्यांनी केलेली ‘ही’ गोष्ट; प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणाले, “अचानक ते…”
Star Pravah Sukh Mhanje Nakki Kay Asta Serial Off Air
१२६१ भाग, ४ वर्षांचा प्रवास; ‘स्टार प्रवाह’ची ‘ही’ लोकप्रिय मालिका संपली! सेटवर ‘असं’ पार पडलं सेलिब्रेशन, कलाकार झाले भावुक
Vanita Kharat
“माझा एक बॉयफ्रेंड होता…”, वनिता खरात ९०च्या दशकातील आवडत्या गाण्याचा किस्सा सांगत म्हणाली…
bigg boss marathi season 5 fame yogita Chavan lavani dance video viral
Video: “मला लागली कुणाची उचकी…”, योगिता चव्हाणची ठसकेबाज लावणी; नेटकऱ्यांकडून होतंय भरभरून कौतुक, म्हणाले…

तर दुसऱ्या फोटोत सोनालीने अभिषेकचा फोटो पोस्ट केला आहे. विशेष म्हणजे अभिषेक लवकरच झी मराठीवरील एका नव्या मालिकेत झळकणार आहे. सारं काही तिच्यासाठी असे या मालिकेचे नाव आहे. या मालिकेततो कोणतं पात्र साकारणार याबद्दल माहिती मिळालेली नाही.

sonalee gurav
सोनाली गुरव

मात्र सोनालीने त्याला या मालिकेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. “तुझ्यासाठी मी फारच आनंदी आहे”, अशी कमेंट तिने केली आहे. त्याबरोबरच तिने हार्ट इमोजी पोस्ट केला आहे. सोनालीच्या या फोटोंची आणि तिच्या स्टोरीची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

sonalee gurav 1
सोनाली गुरवची कमेंट

आणखी वाचा : “गुन्हेगारांना लवकरच शिक्षा होणार…” व्हायरल अश्लील व्हिडीओप्रकरणी मराठमोळ्या इन्स्टा स्टारच्या नव्या पोस्टने वेधलं लक्ष

विशेष म्हणजे सोनाली आणि अभिषेकने याआधीही इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केले होते. त्यामुळे ते दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचा अंदाज वर्तवला जात होतो. मात्र आता तिच्या या कमेंटमुळे त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

दरम्यान अभिषेकने ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत अनिल हे पात्र साकारलं होतं. त्याबरोबरच तो ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतही झळकला होता. याबरोबर त्याने ‘अंजली’ या मालिकेतही काम केले आहे. तर सोनाली ही सोशल मीडियावर रिल स्टार म्हणून प्रसिद्ध आहे. ती अनेक व्हिडीओ शेअर करताना दिसते.

Story img Loader