झी मराठी वाहिनीवरील सर्वच मालिका या प्रेक्षकांमध्ये फार प्रसिद्ध आहेत. गेल्या काही दिवसांपासून या वाहिनीवर विविध धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या मालिकांच्या हटके विषयामुळे अनेक प्रेक्षक त्याला पसंती देताना पाहायला मिळतात. या वाहिनीवरील ‘३६ गुणी जोडी’ ही मालिका प्रेक्षकांमध्ये फारच लोकप्रिय झाली आहे. या मालिकेमुळे अभिनेता आयुष संजीव हा घराघरात पोहोचला. नुकतंच त्याच्या एका पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
अभिनेता आयुष संजीव हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. झी मराठी वाहिनीवरील ‘३६ गुणी जोडी’ या मालिकेत तो मुख्य भूमिकेत झळकत आहे. नुकतंच आयुषने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने एक जुना फोटोही शेअर केला आहे.
आणखी वाचा : “बेबी ऑन बोर्ड”! लग्नानंतर ६ वर्षांनी प्रसिद्ध सेलिब्रेटी जोडप्याने दिली गुडन्यूज
आयुष संजीवची पोस्ट
“मला अजूनही हा दिवस चांगला आठवतोय, ज्यावेळी आपली शेवटची ट्रेन सुटली होती आणि आपल्याला रेल्वे स्टेशनवर झोपावं लागलं होतं…. तू तेव्हा पण होतास आता पण आहेस आणि नेहमी राहशील , अभी तो बस किट बॅग आया हे भैया , गेम अभी बाकी है.
या पोस्टमधील दुसरा फोटो हा जुहू बीचवरचा आहे. जेव्हा आमची बदलापूरला जाणारी शेवटची ट्रेन सुटली होते, तेव्हा आम्ही स्वप्ननगरी मुंबईत झोपण्यासाठी जागा शोधत होतो”, असे आयुषने म्हटले आहे.
आणखी वाचा : “अंतरा, मला एक वळण दिसतंय…” मराठमोळ्या अभिनेत्रीची लेकीसाठी खास पोस्ट
दरम्यान आयुष संजीवची ही पोस्ट वाचून अनेकजण भावूक झाले आहे. अनेकांनी त्याच्या या पोस्टवर कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. अनेकांनी त्याच्या पोस्टवर हार्ट इमोजी शेअर करत कमेंट केली आहे.