इन्स्टाग्राम, फेसबुक आणि युट्यूब यांसारख्या समाजमाध्यमांवर जनजागृती घडवून आणणाऱ्या क्रिएटर्सचा नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सध्या देशभरातील अनेक क्रिएटर्स हे सेलिब्रेटींइतकेच प्रसिद्ध झाले आहेत. यापैकीच एक जोडी म्हणजे अभि अँड नियू.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभि अँड नियू म्हणजेच अभिराज आणि नियती. हे दोघं देशातील आघाडीच्या सोशल मीडिया क्रिएटर्सपैकी एक म्हणून ओळखले जातात. अभि अँड नियू एकत्र मिळून विविध विषयांची सखोल माहिती सर्वांना देत असतात. या जोडप्याचा नुकताच ‘प्रतिभावान युट्यूबर’ म्हणून राष्ट्रीय पुरस्कार देऊन पंतप्रधानांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. परंतु, तुम्हाला माहितीये का हा प्रसिद्ध युट्यूबर अभि एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा लेक आहे.

हेही वाचा : “नार्वेकरांनी ‘खरी’ ठरवलेली शिवसेना बाळासाहेबांचं…”, किरण मानेंचा शिंदे गटाला टोला; म्हणाले, “…ये मेरी गॅरंटी है”

अभिराज आणि नियती हे नवरा-बायको आहेत. अभिचं संपूर्ण नाव अभिराज राजाध्यक्ष असून तो हिंदी व मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री अनुराधा राजाध्यक्ष यांचा मुलगा आहे. अनुराधा राजाध्यक्ष गेली अनेक वर्षं विविध मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. त्या सोशल मीडियावरही सक्रिय असतात. आतापर्यंत अनेकदा त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या मुलाच्या आणि सूनेच्या कामाचं भरभरून कौतुक केलं आहे.

हेही वाचा : “तू आई होऊ शकणार नाहीस”, जुई गडकरीने सांगितला ‘तो’ कठीण प्रसंग; म्हणाली, “वयाच्या २७ व्या वर्षी…”

लेक व सुनेचा पंतप्रधानांच्या हस्ते सन्मान झाल्यावर अनुराधा राजाध्यक्षांनी खास पोस्ट शेअर करत या दोघांचं कौतुक केलं आहे. “आई म्हणून आज तुम्हा दोघांचाही खूप खूप अभिमान वाटतोय. अभिमानास्पद कामगिरी…लव्ह यू अभिराज आणि नियती” असं कॅप्शन देत अभिनेत्रीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Famous youtuber abhi and niyu won national award abhiraj rajadhyaksha is son of marathi actress sva 00