मनोरंजन क्षेत्रातील अग्रगण्य वाहिनी म्हणून झी मराठी वाहिनीकडे बघितले जाते. दर्जेदार मालिका, मेजवानी व विनोदी कार्यक्रम यामुळे प्रेक्षक आवर्जून ही वाहिनी पाहत असतात. झी मराठी वाहिनीचे सोशल मीडिया अकाऊंट सध्या चर्चेत आले आहे त्यामागे एक कारण आहे. त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर सगळ्या पोस्ट या उलट्या दिसत आहेत.
झी मराठीच्या इन्स्टाग्राम, ट्वीटर अकाउंटवर पोस्ट सगळ्या उलट्या दिसत आहेत. शेअर केलेले व्हिडीओ त्यावरचे कॅप्शनदेखील उलटे लिहले आहेत. हा प्रकार घडताच नेटकऱ्यांनीदेखील कमेंट करण्यास सुरवात केली आहे. एकाने लिहले आहे, “सर्व काही उलटे का आहे?” तर दुसऱ्याने लिहले आहे “टीआरपीसाठी झी मराठी सिरीयलची वेळ पण आता उलटी सांगणार का?” तर तिसऱ्याने लिहले आहे “यांनी मुद्दाम केले असणार.”
‘बिग बॉस’ फेम अक्षयबरोबरच्या नात्यावर समृद्धी केळकरने अखेर केला खुलासा; म्हणाली, “मी त्याची…”
“आता काय नवीन येतंय का यांचं?” असा सवाल काही लोकांनी केला आहे तर “चुकून सगळे उलटे अपलोड केले का?” असेही काहीजण विचारत आहेत. आता नक्की काय प्रकार घडला आहे हे वाहिनी लवकरच जाहीर करेल.
झी मराठीवर सध्या ‘तू चाल पुढं’, ‘नवा गडी नवं राज्य’, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्या आहेत. गेली अनेकवर्ष सुरु असलेला ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमदेखील आजही प्रेक्षक आवर्जून बघतात. ‘३६ गुणी जोडी’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. तसेच काही जुन्या मालिकांचे पुनःप्रक्षेपण सुरु केलं आहे.