लोकप्रिय मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार सध्या ‘मुरांबा’ मालिकेत रागिनी नावाच्या खलनायिकेची भूमिका साकारत आहे. विशाखा सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. ती अनेक विषयांवर तिची मतं मांडत असते. इतकंच नाही तर ती तिचे फोटो व व्हिडीओ इन्स्टाग्रामवर चाहत्यांबरोबर शेअर करत असते. अनेकदा ती चाहत्यांच्या कमेंट्सला उत्तरंही देते. सध्या तिच्या पोस्टवरील अशाच एका कमेंटने लक्ष वेधलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“हे पटत नाहीये…” निवेदिता सराफ यांनी नाट्यगृहांबद्दल केलेल्या ‘त्या’ विधानावर विशाखा सुभेदारचं स्पष्ट मत; म्हणाली, “पूर्वीचा…”

विशाखाने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. त्यात तिने एका कार्यक्रमासाठी लांब सिल्व्हर जॅकेट असलेला ड्रेस घातला होता आणि थोडी वेगळी केसभुषा केली होती. नेहमी पारंपारिक कपड्यांमध्ये आणि साडीमध्ये वावरणाऱ्या विशाखाला या फोटोतील ड्रेसमध्ये पाहिल्यावर एका चाहतीने कमेंट केली.

एका चाहतीने लिहिलं, “मी जे लिहिणार आहे, ते वाचून तू बहुतेक माझा राग करशील पण तुझ्यावर मनापासून प्रेम करते म्हणून न राहावून लिहितेय. खोट्या कमेंट्स वाचून स्वतःचे नुकसान करून घेऊ नकोस. तू जशी आहेस, तशीच छान आहेस, तू उत्तम अभिनेत्री आहेस, हे तू खूप वेळा सिद्ध केलंय. पण तुला या लूकमध्ये पाहून मनाला त्रास झाला. तू म्हणशील सगळे कौतुक करतायत आणि ही असं का म्हणतेय, पण तुझ्याबद्दल अटॅचमेंट वाटते, त्यामुळे मी लिहिलं तू राग मानू नकोस.”

विशाखा सुभेदारने चाहतीला दिलेलं उत्तर

या कमेंटला विशाखा उत्तर देत म्हणाली, “तुमच्या भावना समजू शकते, नसेल आवडलं तुम्हाला.. पण यात वाईट काय दिसतंय? ज्याचा तुम्हाला त्रास झाला.. एका डान्स परफॉर्मन्ससाठी तयार झाले होते, त्याचे हे कपडे आहेत, कारण त्यांची मागणी तशी होती.”

दरम्यान, या चाहतीने पुन्हा कमेंट केली. “मला तुला नाव ठेवायचं नव्हतं, पण मला कदाचित ते नीट मांडता आलं नाही म्हणून तुझा गैरसमज झाला असेल. माझ्या बोलण्याचे तुला वाईट वाटलं असेल तर माफी मागते. पण मी वाईट हेतुने काहीच बोलले नव्हते”. यावर “मला अजिबात वाईट वाटलं नाहीये, खरंच.. मला तुमचं प्रेम समजतं” असं विशाखा म्हणाली.

विशाखा सुभेदारने चाहतीला दिलेलं उत्तर

दरम्यान, अनेकांनी विशाखाच्या या खास लूकचं कौतुक केलं आहे. ‘एक अभिनेत्री म्हणून नेहमीच छान आहात, आपले हाव भाव व बोलकी नजर अफलातून आहे, हाही लूक आवडला सुंदर’ अशा शब्दात एका चाहतीने विशाखाचं कौतुक केलं.