‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड. ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत प्राजक्ताने महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारली होती. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या प्राजक्ताचं फॅन फॉलोइंगसुद्धा मोठं आहे. रोजच्या जीवनातील विविध घडामोडी प्राजक्ता चाहत्यांसोबत शेअर करत असते.
प्राजक्ताच्या आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक असतात. त्याचप्रमाणे अनेक जण तिला भेटण्याची इच्छा देखील सोशल मीडियावरून व्यक्त करतात. आता नुकताच सोशल मीडियावरून तिने चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी एका चाहत्याने तिला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. यावर प्राजक्ताने दिलेल्या उत्तराने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
आणखी वाचा : Video: …अन् माईकसमोर बोलता बोलता प्राजक्ता गायकवाडला कोसळले रडू, जाणून घ्या कारण
एका चाहत्याने प्राजक्ताला लिहिलं, “मी तुमचा खूप मोठा चाहता आहे. तुम्हाला एकदा भेटून मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे. प्लीज ताई रिप्लाय द्या.” प्राजक्ताने देखील चाहत्याच्या या मागणीवर उत्तर दिलं. तिने लिहिलं, “नक्कीच भेट होईल.” तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ही स्टोरी पोस्ट केली.
हेही वाचा : Video: प्राजक्ता गायकवाडने खरेदी केलं नवीन घर, गृहप्रवेशाचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली…
आता तिच्या या नम्रपणाचं आणि साधेपणाचं सर्वजण कौतुक करत आहेत. दरम्यान ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्यातही ती महाराणी येसूबाईंची भूमिका साकारताना दिसत आहे. या नाटकाच्या निमित्ताने सध्या तिचे विविध शहरांमध्ये दौरे सुरू आहेत.