‘बिग बॉस ओटीटी’चं विजेतेपद पटकावल्यानंतर अभिनेत्री दिव्या अग्रवाल अधिक चर्चेत आली. दिव्या तिच्या कामाबरोबरच खासगी आयुष्यामुळेही कायमच चर्चेत राहिली. बॉयफ्रेंड वरुण सूदबरोबर २०२२मध्ये ब्रेकअप करत तिने व्यावसायिक अपूर्व पाडगांवकरसह साखरपुडा केला. यादरम्यानचे फोटो तिने शेअर करताच सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. आधी कोणतीही चर्चा नसताना तिने सगळ्यांनाच हा सुखद धक्का दिला.
आणखी वाचा – प्राजक्ता माळीचा पुण्यामध्ये आहे ‘हा’ व्यवसाय, अभिनेत्रीने पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाली, “अजूनही…”
याआधी काही वर्ष दिव्या व वरुण रिलेशनशिपमध्ये होते. पण दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली आणि त्यांच्या नात्याचा दि एण्ड झाला. आता तिचं खासगी आयुष्य पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी तिने एक सेशन ठेवलं होतं. या सेशनद्वारे तिने चाहत्यांना प्रश्न विचारण्याची संधी दिली.
यावेळी एका चाहत्याने तिला एक वेगळाच प्रश्न विचारला. “तू व्हर्जिन आहेस का?” असं एकाने दिव्याला विचारलं. यावर तिने अगदी एका शब्दामध्ये उत्तर दिलं. दिव्याने ‘हो’ असं यावर उत्तर दिलं. शिवाय तिला तिच्या खासगी आयुष्याबाबतही अनेक प्रश्न विचारण्यात आले. काही दिवसांपूर्वी दिव्या व वरुणमधील वाद पुन्हा एकदा पेटला होता.
वरुणच्या बहिणीने दिव्याकडे त्याने दिलेले सोन्याचे दागिने मागितले. सोशल मीडियावरच दोघांमधील हा वाद सुरू झाला. यावेळी दिव्याने एक सोन्याच्या लॉकेटचा फोटो शेअर करत हेच ते दागिने आहेत असं म्हटलं होतं. हे दागिने तिने वरुणला परत केले. पण सोशल मीडियावर अशाप्रकारे व्यक्त होणं दिव्याला अजिबात आवडलं नाही.