‘बिग बॉस हिंदी’च्या सोळाव्या पर्वाचा विजेता ठरलेल्या एमसी स्टॅनची क्रेझ अजूनही कमी झालेली नाही. विजेतेपद मिळवल्यानंतर स्टॅनच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. ‘बिग बॉस’नंतर पुण्याचा रॅपर एमसी स्टॅनचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
‘बिग बॉस हिंदी’चा विजेता ठरल्यानंतर स्टॅनने चाहत्यांसाठी भारत दौरा आयोजित केला होता. या दौऱ्यातून एमसी स्टॅनचे संपूर्ण देशात कॉन्सर्ट होणार आहेत. शुक्रवारी १० मार्चला हैदराबाद येथे स्टॅनचा कॉन्सर्ट पार पडला. याच कॉन्सर्टमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा>> “शूटिंगमध्ये असतानाच प्रसुतीच्या कळा सुरू झाल्या अन्…” कॉमेडियन भारती सिंहने सांगितला ‘तो’ प्रसंग
हैदराबादमधील एमसी स्टॅनच्या कॉन्सर्टसाठी हजारो चाहत्यांनी गर्दी केली होती. स्टॅन स्टेजवर गात असताना गर्दीतून पाण्याची बाटली त्याच्याकडे फेकण्यात आली. पाण्याची बाटली स्टॅनच्या बाजूला पडल्यामुळे त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही. एमसी स्टॅनच्या कॉन्सर्टमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर स्टॅनने हैदराबादमधील त्याचं कॉन्सर्ट रद्द केलं आहे. दुनिया दिवाना या इन्स्टाग्राम पेजवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
हेही वाचा>> ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परब झळकली हिंदी जाहिरातीत, व्हिडीओ पाहिलात का?
हेही वाचा>> ३२व्या वर्षी मालिकाविश्वातील अभिनेत्रीने केले Eggs Freeze, म्हणाली “भविष्यात लग्न…”
‘बिग बॉस हिंदी’चं विजेतेपद मिळवल्यानंतर एमसी स्टॅनला अनेक ब्रँडच्या ऑफर मिळाल्या. त्याला बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक साजिद-वाजिद यांच्याकडूनही गाण्याची ऑफर मिळाल्याची चर्चा आहे.