फिफा विश्वचषक २०२२ वर अर्जेंटिनाने नाव कोरलं. फ्रान्स व अर्जेंटिनामध्ये रविवारी(१८ नोव्हेंबर) विश्वचषकाचा उत्कंठावर्धक सामना रंगलेला पाहायला मिळाला. अर्जेंटिनाच्या विजयाचा शिल्पकार असलेल्या लिओनेल मेस्सीवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मनोरंजन विश्वातील अनेक फुलबॉलप्रेमी सेलिब्रिटीही मेस्सीचं कौतुक करत आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला गौरव मोरेही मेस्सीचा चाहता आहे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिना संघाने केलेल्या कामगिरीमुळे सगळेच भारावून गेले. मेस्सीच्या खेळाने गौरव मोरेही प्रभावित झाला आहे. अंतिम सामना संपल्यानंतर गौरवने मेस्सीचा फोटो शेअर करत त्याचं कौतुक केलं आहे.
गौरवने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये मेस्सीचा विश्वचषकाला चुंबन घेतानाचा फोटो शेअर केला आहे. २०१४ साली मेस्सीचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न अर्धवट राहिलं होतं. म्हणूनच या स्टोरीला गौरवने “स्वप्न सत्यात उतरलं” असं कॅप्शन दिलं आहे. गौरवच्या या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
हेही वाचा>>‘बिग बॉस’च्या घरातून अमृता देशमुख बाहेर; विकास सावंत पाठोपाठ ‘पुण्याच्या टॉकरवडी’ची एग्झिट
हेही पाहा>> “महाराजांचे नाव घेऊन सनातनी हिंदूला मारणे, हे…” केतकी चितळेचं वक्तव्य चर्चेत
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून लोकप्रियता मिळवलेला गौरव चित्रपटांतही झळकला आहे. ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित झालेल्या हवाहवाई चित्रपटात तो दिसला होता. त्यानंतर एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी गौरव लंडनला गेला होता.