‘शार्क टँक इंडिया’ हा कार्यक्रम त्याच्या तिसऱ्या सीझनमुळे पुन्हा चर्चेत आहे. सोमवार २२ जानेवारी २०२४ पासून हा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला. आत्तापर्यंत या सीझनचे बरेच भाग प्रदर्शित झाले आहेत. या सीझनलाही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. पहिल्या दोन सीझनप्रमाणेच या सीझनचीही प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. तिसऱ्या सीझनमध्येसुद्धा प्रेक्षकांना नवीन उद्योजक शार्कच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘शार्क टँक इंडिया’मध्ये नवनवे फाऊंडर्स त्यांच्या व्यवसायासाठी फंडिंग गोळा करण्यासाठी येतात, पण नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार ‘शार्क टँक इंडिया’च्या मंचावर होणाऱ्या डील्सपैकी ५०% डील्स ह्या पूर्णत्वास येत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. बऱ्याच मुलाखतींमध्ये या शोमध्ये भाग घेणाऱ्या शार्क्सनीच याबद्दल भाष्य केलं आहे. फाऊंडरच पळून जाणे, किंवा ज्या कंपनीबरोबरच डील केलं आहे ती कंपनी रजिस्टरच नसणे अशा वेगवेगळ्या समस्यांचा शार्क्सना सामना करावा लागत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

आणखी वाचा : “देश हा धर्मापेक्षा श्रेष्ठ…”, रणदीप हुड्डाच्या बहुचर्चित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित

‘पीटीआय’शी संवाद साधतांना शार्क्स यांनी सांगितलं की, “त्या एका तासाच्या एपिसोडमध्ये कुणालाच चेक मिळत नाही. जेव्हा आम्ही एखाद्या कंपनीमध्ये पैसे गुंतवतो त्यामागे एक मोठी प्रक्रिया असते. ज्या कंपन्या स्थापनदेखील झालेल्या नाहीत त्यांच्याबाबतीतील बऱ्याच गोष्टींची पडताळणी करणे आवश्यक असते. फाऊंडर शोमध्ये येऊन काय सांगतोय अन् ते कितपत खरं की खोटं आहे याच्याशी त्याचा काहीच संबंध नसतो. आम्हीदेखील अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक नसतो ज्याचा फाउंडर हा फ्रॉड असतो.”

सीझन ३ बद्दल बोलताना अमन गुप्ताने सांगितलं की असे बरेच फाऊंडर आहेत ज्यांनी शोवर डील झाल्यानंतर आमच्या कोणत्याच गोष्टीला प्रतिसाद दिलेला नाही. नमिता थापर हिलासुद्धा असे बरेच अनुभव आल्याचं तिने एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं. ‘शादी.कॉम’ व ‘पीपल्स ग्रुप’चे सीइओ अनुपम मित्तल यांनीही ‘मिंट’शी संवाद साधतांना असाच काहीसा अनुभव शेअर केला. अनुपम म्हणाले, “प्राथमिक गुंतवणूक केल्यावरही ९०% डील्स पूर्णत्वास येत नाहीत यासाठी सर्वस्वी त्या कंपनीचे फाऊंडर्सच कारणीभूत असतात. त्यांना वाटतं की त्यांच्या कंपनीला बाहेर आणखी जास्त वॅल्यूएशन मिळेल. आम्ही जर २० डील्स करत असू तर त्यापैकी १० डील्सच पूर्ण होतात.” विनीता सिंग व राधिका गुप्ता यांनीदेखील अशीच खंत व्यक्त केली आहे. ‘शार्क टँक इंडिया’ हा शो तुम्ही सोनी टेलिव्हिजन आणि सोनी लीव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifty percent deals of shark tank india never happens sharks speaks about the truth avn
Show comments