‘नवरी मिळे हिटलरला’ (Navri Mile Hitlarla) मालिकेत सतत काही ना काही घडताना दिसते. मालिकेत सतत ट्विस्ट येताना दिसतात. एजे व लीला यांच्यातील छोटी-मोठी भांडणे, त्यांच्यातील मैत्री प्रेक्षकांना आवडते. परफेक्ट एजे व वेंधळेपणा करणारी लीला यांची जोडी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसत आहे. या मालिकेतील एजे व लीला यांच्याबरोबरच दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, विश्वरूप, रेवती, यश, आजी अशी सर्व पात्रे प्रेक्षकांचे मन जिंकून घेताना दिसतात. लीला व तिच्या सुनांमधील म्हणजेच दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती यांच्यातील भांडणेदेखील प्रेक्षकांचे मन जिंकताना दिसतात. आता या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला असून दुर्गा व लीला पुन्हा एकदा समोरासमोर आल्याचे पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला पाहायला मिळते की यश, रेवती, लीला व एजे लीलाच्या माहेरी एकत्र जमले आहेत. एजे म्हणतो, “हे सगळं थांबवायला हवं. तुमचं लग्न लवकरात लवकर व्हायला हवं”, त्याच्या या बोलण्यावर यश म्हणतो, “एजे ताईचं काय?”, त्यावर एजे म्हणतो, “माझ्यासाठी तुमचं भविष्य महत्त्वाचं आहे, दुर्गाशी मी बोलीन.” प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, यश व लीला परत घरी येतात. ते घरात येताच दुर्गा यशला म्हणते, “यश तू परत त्या मुलीला भेटायला गेला होतास?” यश म्हणतो, “ताई तिचं नाव रेवती आहे.” दुर्गा त्याला म्हणते, “यश मी तुला शेवटचं सांगतेय. तिला विसर, तुम्हा दोघांचं काही भविष्य नाहीये”, त्यावर तिथेच उभी असलेली लीला म्हणते, “दुर्गा तू हे एकटी ठरवू शकत नाहीस”, त्यावर दुर्गा म्हणते, “यशच्या बाबातीत कुठलाही निर्णय घेण्याची परवानगी मी तुम्हाला दिलेली नाहीये.”

इन्स्टाग्राम

मालिकेच्या या प्रोमोला, “अभिराम, रेवती आणि यशचं लग्न लावून देणार का?” अशी कॅप्शन दिली आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे यश व रेवती यांचे एकमेकांवर प्रेम आहे. यश हा दुर्गाचा भाऊ आहे, तर रेवती ही लीलाची बहीण आहे. एजेने श्वेताचे लग्न यशबरोबर लावायचे ठरवले होते, पण शेवटी त्याला हे समजले की यश व रेवती एकमेकांच्या प्रेमात आहेत. आता एजेदेखील त्यांच्या लग्नासाठी तयार झाला आहे. मात्र, दुर्गाला त्याच्या भावाची बायको म्हणून रेवती पसंत नाही. कारण रेवती व सरस्वतीचा भाऊ विक्रांत एकमेकांच्या प्रेमात होते. त्यावेळी विक्रांतचे लग्न झाले असून ते एकमेकांबरोबर रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, विक्रांत रेवतीला फसवत असल्याचे समोर आले. त्याने लीला व त्याच्या बायकोला किडनॅपदेखील केले होते. त्यावेळी एजेने त्यांना वाचवत विक्रांतला पोलिसांच्या ताब्यात दिले होते. आता पुन्हा एकदा विक्रांत एजे-लीलाच्या आय़ुष्यात आल्याचे दिसत आहे.

हेही वाचा: कमल हासन व सारिका यांच्या घटस्फोटावर व्यक्त झाली श्रुती हासन; म्हणाली, “आई या लग्नातून बाहेर पडली त्यावेळी…”

आता यश-रेवतीच्या लग्नासाठी एजे दुर्गाला समजाऊ शकणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.