तृतीयपंथी मराठी अभिनेत्री प्रणित हाटे (Pranit Hatte Wedding Photos) सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. आपले फोटो व व्हिडीओ शेअर करून चाहत्यांचं मनोरंजन करणाऱ्या प्रणितने एक आनंदाची बातमी दिली आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री प्रणित हाटे लग्नबंधनात अडकली आहे. तिने सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठी अभिनयसृष्टीतील पहिली तृतीयपंथी अभिनेत्री प्रणित हाटेचा लग्न सोहळा पार पडला आहे. प्रणित हाटेने आज शनिवारी (१ फेब्रुवारी २०२५ रोजी) लग्नगाठ बांधली. “गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने एक नवीन सुरुवात…”, असं कॅप्शन देत प्रणितने लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

लग्नात प्रणितने लाल रंगाची साडी नेसली होती. तर, साधासा मेकअप केला होता. प्रणितच्या हातात हिरव्या रंगाचा चुडा पाहायला मिळतोय. प्रणितच्या पतीने पांढरा कुर्ता-पायजामा व लाल जॅकेट घातल्याचं फोटोत दिसत आहे. प्रणितने तिच्या पतीबरोबर दोन फोटो पोस्ट केले आहेत. ही माझी नवीन सुरुवात आहे, असं प्रणितने म्हटलं आहे. प्रणितच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

पाहा प्रणितची पोस्ट

प्रणितने झी मराठीच्या ‘कारभारी लयभारी’ मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. या मालिकेत तिने गंगाची भूमिका साकारली होती. याशिवाय युवा डान्सिंग क्वीन मधूनही तिने तिच्या नृत्याने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. वैयक्तिक आयुष्यात आलेल्या अडचणींवर मात करत तिने मराठी अभिनयक्षेत्रात नाव कमावलं. आता तिने लग्न करत आयुष्यात नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे. त्यासाठी चाहते तिचं अभिनंदन करत आहेत.